नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी पीएमपीएमएलचा ‘प्रवासी दिन’ – जन समाचार लाइव 24

दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी पीएमपीएमएलचा ‘प्रवासी दिन’

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी पीएमपीएमएलचा ‘प्रवासी दिन’

सायंकाळी ५ ते ७ या वेळेत प्रत्येक डेपोत तक्रारी व सूचना स्वीकारल्या जाणार

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बससेवेबाबत प्रवाशांना येणाऱ्या अडचणी व तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी आता दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी ‘प्रवासी दिन’ आयोजित करण्यात येणार आहे. या दिवशी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत प्रत्येक पीएमपीएमएल डेपोत प्रवाशांना आपल्या तक्रारी व सूचना सादर करता येणार आहेत.

पीएमपीएमएलच्या विविध मार्गांवर व स्थानकांवर प्रवाशांना चांगली, तत्पर आणि विश्वासार्ह बससेवा मिळावी, तसेच प्रवाशांच्या अडचणींची तातडीने दखल घेऊन त्यांचे निराकरण व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांच्या संकल्पनेतून हा प्रवासी-केंद्रित उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रवाशांच्या सूचना, तक्रारी आणि सेवा सुधारण्यासाठीच्या अपेक्षा थेट परिवहन महामंडळापर्यंत पोहोचाव्यात, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

‘प्रवासी दिना’निमित्त प्रत्येक डेपोसाठी नियुक्त करण्यात आलेले संबंधित अधिकारी डेपोमध्ये उपस्थित राहणार असून, प्रवाशांच्या तक्रारी व सूचनांची नोंद घेऊन त्यावर आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.

दररोजच्या कामामुळे किंवा वेळेअभावी डेपोमध्ये प्रत्यक्ष येऊन तक्रार अथवा सूचना देणे शक्य नसलेल्या प्रवाशांनी पीएमपीएमएलच्या कोणत्याही डेपोमध्ये अर्जाद्वारे आपल्या तक्रारी व सूचना सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवाशांच्या सहभागातून बससेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि प्रवासीभिमुख करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930