नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , साने संगीत विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात – जन समाचार लाइव 24

साने संगीत विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

साने संगीत विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात

पुणे, प्रतिनिधी : सम्राट बहुउद्देशीय जनजागृती सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत भारतीय गांधर्व संगीत महाविद्यालय मंडळ, पुणे आयोजित साने संगीत विद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारोह उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिल्पा लेले होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक विनोद अष्टुळ आणि युवा उद्योजक सागर बाळासाहेब कांचन उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ साहित्यिक विनोद अष्टुळ म्हणाले की, “संगीत ही केवळ कला नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासासोबतच आपल्या कलागुणांना वाव देत सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर यश संपादन करावे.” गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केल्याने त्यांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन मिळते तसेच भविष्यात आणखी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी ओमकार बगाडे, श्रीशा काकडे, वेदांत कुतवळ, पार्थ बोत्रे, साई जाधव, वैष्णवी साळुंखे, पूर्वी ठाकरे, रियान पराग, आरोही साळुंखे, कृष्णा लहोरे, सृष्टी भोसले, ऋतुजा आवळे, हर्षद बोबडे, सुयश घनवट, शौर्य सुरवसे आणि संकेत खंडागळे आदी विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमास ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे, महानुभाव पंथाचे महंत गोपालव्यास कपाटे, लोकमतचे पत्रकार सहदेव खंडागळे, महासुपर फास्ट न्यूजच्या संपादिका सुवर्णा कांचन, महाराष्ट्राची भूमीचे पत्रकार बापुसो चौधरी, गुरुदत्त तरुण मंडळाचे अध्यक्ष सुनिल तुपे, पालक, विद्यार्थी तसेच साने संगीत विद्यालयाचे संगीतकार व गायक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक साने संगीत विद्यालयाचे आदरणीय शिवराज ज्ञानोबा साने सर यांनी केले. प्रसिद्ध निवेदक रोहिदास बिचकुले सर यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले. तर पत्रकार अमोल भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

सम्राट बहुउद्देशीय जनजागृती सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष सौ. रेखा शिवराज साने यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या गुणगौरव सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930