प्रामाणिकपणाचा आदर्श! बालेवाडी आगाराच्या कंडक्टरने प्रवाशाचा १२ हजारांचा मोबाईल केला परत
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
प्रामाणिकपणाचा आदर्श! बालेवाडी आगाराच्या कंडक्टरने प्रवाशाचा १२ हजारांचा मोबाईल केला परत
पुणे, दि. २९ ऑगस्ट : प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि प्रवाशांप्रती असलेल्या बांधिलकीचा आदर्श बालेवाडी आगारातील कर्मचाऱ्यांनी घालून दिला आहे. बसमध्ये विसरलेला सुमारे १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल सुरक्षितपणे संबंधित प्रवाशाला परत करून कंडक्टर सौ. सुनंदा वामन राठोड यांनी कौतुकास्पद कामगिरी केली.
शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या पाळीत बालेवाडी आगाराकडील मार्ग क्रमांक ३५५ अ/४, बस क्रमांक १९० (चिखली ते राधा चौक) या बसमध्ये एका प्रवाशाचा मोबाईल विसरून राहिला होता. मोबाईल आढळून आल्यानंतर कंडक्टर सौ. सुनंदा राठोड यांनी कोणताही विलंब न करता तो मोबाईल सुरक्षितपणे आगारामध्ये जमा केला.
त्यानंतर संबंधित प्रवाशाची ओळख पटवून त्यांचा मौल्यवान मोबाईल सुरक्षितपणे परत करण्यात आला. या प्रामाणिक कृतीमुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सौ. सुनंदा राठोड यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, जबाबदारीची जाणीव आणि प्रवाशांप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सौ. सुनंदा वामन राठोड यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच बालेवाडी आगार व्यवस्थापक बाबासाहेब बांगर आणि आगारातील संपूर्ण टीमचेही या कामगिरीबद्दल कौतुक करण्यात आले.
“प्रवाशांचा विश्वास हीच PMPML ची खरी संपत्ती!” या भावनेला बालेवाडी आगाराच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कृतीतून साकार केले आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





