थेऊर फाट्याजवळ गांजा विक्रीसाठी आणणाऱ्यावर लोणी काळभोर पोलिसांची कारवाई
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
थेऊर फाट्याजवळ गांजा विक्रीसाठी आणणाऱ्यावर लोणी काळभोर पोलिसांची कारवाई
लोणी काळभोर, दि. २९ ऑगस्ट : लोणी काळभोर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात कारवाई करत थेऊर फाट्याजवळील ब्रिज परिसरातून १ किलो १४४ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास थेऊर फाट्याजवळील ब्रिज परिसरात ही कारवाई करण्यात आली. आरोपी रोहन लक्ष्मण थोरात (वय १९, रा. माळीमळा, लोणी काळभोर) याच्याकडे विक्रीच्या उद्देशाने गांजा असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.
या कारवाईत ५५ हजार रुपये किमतीचा १,१४४ ग्रॅम गांजा, ५० हजार रुपये किमतीची सुझुकी अॅक्सेस मोपेड (क्र. एमएच-१२-एक्सझेड-२५४४) तसेच १० हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी रोहन थोरात याने सतीश ऊर्फ सत्या विठ्ठल चव्हाण (रा. धुमाळ मळा, लोणी काळभोर) याच्याकडून गांजा मिळवून तो स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव करीत आहेत. कारवाईबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्याकडून पुढील तपास सुरू आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





