नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , कृषी व पशूसंवर्धन विभागाच्या, शेतकऱ्यांना थेट लाभाच्या DBT योजना त्वरित सुरू करा; सभापती युवराज काकडे यांची मागणी. – जन समाचार लाइव 24

कृषी व पशूसंवर्धन विभागाच्या, शेतकऱ्यांना थेट लाभाच्या DBT योजना त्वरित सुरू करा; सभापती युवराज काकडे यांची मागणी.

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

कृषी व पशूसंवर्धन विभागाच्या, शेतकऱ्यांना थेट लाभाच्या DBT योजना त्वरित सुरू करा; सभापती युवराज काकडे यांची मागणी.

पुणे जिल्हा परिषद कृषी व पशूसंवर्धन विभागांतर्गत राबवल्या जाणाऱ्या थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजना वेळेत सुरू करणे अत्यंत आवश्यक असून, शेतकरी बांधवांना खरीप व रब्बी हंगामात लागणारी अवजारे, बी-बियाणे आणि इतर निविष्ठा वेळेवर उपलब्ध झाल्यास, ऐन पेरणी किंवा कापणीच्या वेळी याचा लाभ शेतकरी बांधवांना होईल, अशी मागणी, पुणे जिल्हा परिषदेचे कृषी व पशूसंवर्धन सभापती अमोल नलावडे यांच्याकडे, हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी केली आहे.

पुणे जिल्हा परिषद शेतकऱ्यांना कृषी व पशूसंवर्धन विभागांतर्गत 75 % अनुदानावर विद्युत मोटार पंपसेट, प्लास्टिक ताडपत्री, PVC पाईप, भातलावणी यंत्र व बॅटरी स्प्रेयर पंप यांसारखी सुधारीत अवजारे पुरवते. तसेच मुक्त संचार गोठा, मिल्किंग मशीन, मुरघास युनिट, गोठा रबर मॅट, कडबाकुट्टी मशीन आणि एकल महिलांना सुधारित जातीचे तलंगा पक्षी व 2 शेळी वाटप. या गोष्टींचे वाटप शेतकरी बांधवांना होऊन शेतातील व शेतीपूरक कामे अधिक सुलभ होण्यास मदत होते.

पुणे जिल्हा परिषदेची थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजना लवकरात लवकर सुरू करणे संदर्भात सभापती युवराज काकडे यांनी, जिल्हा परिषदेचे कृषी व पशूसंवर्धन समितीचे सभापती अमोल नलावडे यांची भेट घेतली. यावेळी या योजना ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्याचीही मागणी केली. मागील काही वर्षात ही योजना ऑनलाईन असल्याने, अनेक शेतकरी सर्व्हर डाऊन व इतर तांत्रिक अडचणींमुळे लाभापासून वंचित राहिले होते. ही बाबत सभापती काकडे यांनी सभापती नलावडे यांच्या निदर्शनास आणून दिली.

यावेळी कृषी व पशूसंवर्धन सभापती अमोल नलावडे यांनी हवेलीचे सभापती युवराज काकडे यांचे निवेदन प्राप्त होताच, याबाबतच्या हालचाली अधिक गतिमान करत, पुढील आठवड्यापासून DBT योजना सुरू करण्याच्या प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31