लोणी काळभोरमध्ये १ किलो २५५ ग्रॅम गांजासह दोघांना अटक
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोणी काळभोरमध्ये १ किलो २५५ ग्रॅम गांजासह दोघांना अटक
लोणी काळभोर : कोळपेवस्ती, रामदरा रोड परिसरात गांजा विक्रीच्या उद्देशाने बाळगणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी रात्री करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम भाऊसाहेब बरकडे (वय २६, रा. कोळपेवस्ती, रामदरा रोड, लोणी काळभोर) आणि गौरव लक्ष्मण जाधव (वय २५, रा. कोळपेवस्ती, लोणी काळभोर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
दि. २३ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८.५० वाजता कोळपेवस्ती, रामदरा रोड येथे रस्त्याच्या कडेला संशयित हालचाली करताना आरोपी आढळून आले. पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे १ किलो २५५ ग्रॅम गांजा आढळून आला. जप्त गांजाची किंमत सुमारे ७५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याशिवाय आरोपींकडून १० हजार रुपये किमतीचे दोन ओप्पो कंपनीचे मोबाईल फोन, असा एकूण ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस शिपाई गणेश बाळासाहेब खरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३८०/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) व २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना रात्री ११.३० वाजता अटक करण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे यांनी केली.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





