नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , ज्येष्ठ नागरिकांना PMPML बस पासमध्ये ५० टक्के सवलत; आजपासून अंमलबजावणी – जन समाचार लाइव 24

ज्येष्ठ नागरिकांना PMPML बस पासमध्ये ५० टक्के सवलत; आजपासून अंमलबजावणी

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

ज्येष्ठ नागरिकांना PMPML बस पासमध्ये ५० टक्के सवलत; आजपासून अंमलबजावणी

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी बस पास दरात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आज, २४ ऑगस्ट २०२६ पासून सुरू करण्यात आली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांनी २ एप्रिल २०२६ रोजी ज्येष्ठ नागरिकांना पास दरात सवलत देण्याची मागणी PMPML प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी झालेल्या PMPML संचालक मंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली.

नवीन निर्णयानुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व मार्गांवर प्रवासासाठी असलेल्या दैनिक पासची मूळ किंमत ७० रुपये आहे. मात्र, ५० टक्के सवलतीनंतर प्रवाशाला केवळ ३५ रुपये द्यावे लागणार आहेत. उर्वरित ३५ रुपयांचे अनुदान पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांकडून प्राप्त होणार आहे.

या निर्णयामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतूक अधिक सुलभ आणि परवडणारी होण्यास मदत होणार आहे.

PMPMLचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड (भा.प्र.से.) यांच्या आदेशानुसार ई-तिकीट प्रणालीमध्ये आवश्यक बदल करण्यात येत असून, सदर सवलतीची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून करण्यात आली आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31