नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , PMPMLच्या कोथरूड आगाराची माणुसकी; १० वर्षीय तेजसला सुखरूप पालकांच्या स्वाधीन – जन समाचार लाइव 24

PMPMLच्या कोथरूड आगाराची माणुसकी; १० वर्षीय तेजसला सुखरूप पालकांच्या स्वाधीन

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

PMPMLच्या कोथरूड आगाराची माणुसकी; १० वर्षीय तेजसला सुखरूप पालकांच्या स्वाधीन

पुणे : PMPMLच्या कोथरूड आगारातील कर्मचारी आणि तपासणी पथकाच्या सतर्कतेमुळे बसमध्ये राहून गेलेल्या १० वर्षीय तेजस पुंडलिक खराटे या मुलाचा शोध घेऊन त्याला सुखरूपपणे आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेचे आणि माणुसकीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

कोथरूड परिसरात गुरुवारी नियमित तपासणी सुरू असताना ही घटना निदर्शनास आली. बस क्रमांक २७६/७ (MH 14 HU 5375) ही NDA गेट येथून सकाळी १०.२५ वाजता चिंचवड गावाच्या दिशेने निघाली होती. वडाच्या बसथांब्यावर प्रवासी उतरले; मात्र त्यांचा १० वर्षीय मुलगा तेजस पुंडलिक खराटे, रा. वसमत, जि. हिंगोली, हा बसमध्येच राहून गेला.

मुलगा बसमध्ये राहिल्याचे लक्षात येताच वाहक गणेश रांगडे (वाहक क्र. २९९८) आणि क्लार्क नितीन सुरेश पगारे यांनी तातडीने त्याचा शोध सुरू केला. वनदेवी परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्रजवळ तेजस रडत असल्याचे त्यांना आढळून आले. कर्मचाऱ्यांनी त्याला धीर देत सुरक्षितपणे कर्वेनगर पोलीस चौकीत नेले.

तेथे PSI नायकवाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने आवश्यक कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर तेजसला त्याचे वडील पुंडलिक खराटे आणि आई सीमा पुंडलिक खराटे यांच्या ताब्यात सुखरूपपणे देण्यात आले.

या कौतुकास्पद कामगिरीबद्दल कोथरूड आगाराचे व्यवस्थापक सचिनजी वाबळे यांनी वाहक गणेश रांगडे आणि क्लार्क नितीन सुरेश पगारे यांचे विशेष अभिनंदन केले.

PMPMLची सेवा ही केवळ प्रवाशांची वाहतूक करण्यापुरती मर्यादित नसून जनसेवा, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकी जपण्याचे माध्यम असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. संकटाच्या प्रसंगी कर्मचाऱ्यांनी दाखविलेली संवेदनशीलता आणि तत्परता ही निश्चितच कौतुकास्पद आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31