नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध करणार- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी. – जन समाचार लाइव 24

थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध करणार- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी.

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

थेऊर येथील ‘समाधान शिबिर’ भर पावसात उत्साहात संपन्न, हवेलीतील पानंद रस्त्यांसाठी भरीव निधी उपलब्ध करणार- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी.

थेऊर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या प्रथम जयंती निमित्त तसेच महसूल दिनाचे औचित्यसाधून, पंचायत समिती हवेली व अप्पर तहसील कार्यालय हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत विशेष ‘समाधान शिबिराचे’ आयोजन, शुक्रवारी (दि. ३१) रोजी थेऊर येथील, आशीर्वाद बँक्वेट हॉल सभागृहात करण्यात आले. या शिबिरात विविध शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना देण्यात आला.
यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी हवेलीतील काही डेव्हलपर्स व बिल्डर्सनी विनापरवानगी नैसर्गिक ओढे- नाले बुजविल्याने नागरी वाड्या-वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी थेट शिरत असून, नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे, हा मुद्दा ठळकपणे उपस्थित करत प्रशासनाचे लक्ष वेधून, संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नदी प्रदूषणामुळे नदीकाठच्या गावांमध्ये डास व मच्छरांचा वाढलेला त्रास, यावरही उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच शिवरस्ते व पाणंद रस्त्यांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महसूल दिन प्रथमच ग्रामीण भागात अभियान स्वरूपात साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. भटके-विमुक्त व आदिवासी समाजातील नागरिकांना जातीचे दाखले, विविध शासकीय प्रमाणपत्रे आणि निवारा उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभाग सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत सुमारे १,८०० कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्यात आली असून, जमीन व घर नसलेल्या आदिवासी कुटुंबांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असे त्यांनी नमूद केले. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शिवरस्ते व पाणंद रस्ते खुले करण्यात आले असून, या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती (DPC) मधून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पुरंदर विमानतळासाठी जमीन हस्तांतरण प्रक्रियेत महसूल अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचेही त्यांनी कौतुक केले.
हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी, लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्य नागरिकांना शासकीय सेवा गावोगावी उपलब्ध करून देणे हे आमचे कर्तव्य असल्याचे सांगत, भविष्यातही सर्वसामान्यांपर्यंत सेवा-सुविधा पोहोचविणार असल्याचे सांगितले.
प्रांतअधिकारी यशवंत माने व तहसीलदार तृप्ती कोलते यांनी सांगितले की, या अभियानातून आतापर्यंत ३६ हजार ४०० नागरिकांना विविध सेवांचा लाभ देण्यात आला असून, जातीचे दाखले, विविध प्रमाणपत्रांचे वाटप तसेच पाणंद रस्त्यांबाबतची कामे वेगाने सुरू आहेत. तसेच आमच्या कार्यालयास प्राप्त झालेल्या प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.
यावेळी आदिवासी समाजाचे अध्यक्ष नामदेवराव भोसले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, आमदार ज्ञानेश्वर कटके, उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर, प्रांतअधिकारी यशवंत माने, तहसीलदार तृप्ती कोलते, सभापती युवराज काकडे, उपसभापती विद्या गायकवाड, जिल्हा परिषद सदस्या सुरेखा हरगुडे, शीतल कांबळे, संदेश आव्हाळे, रमेशबापू हरगुडे, पंचायत समिती सदस्य अमोल टेकाळे, सुदर्शन चौधरी, कृषिराज चौधरी, राणी वाळके, सुषमा मुरकुटे, संतोष मुरकुटे, महावितरणचे देविदास बैकर, उपभियंता महादेव धाडवे तसेच हवेलीतील सर्व ग्राम महसूल अधिकारी, मंडल अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
शिबिरात नागरिकांना विविध दाखले, महसूल विभागाच्या सेवा, महावितरण समस्या, कृषी योजनांसह विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. तसेच महसूल दिनानिमित्ताने हवेलीतील सर्व महसूल अधिकारी, मंडल अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील यांचा सभापती युवराज काकडे व तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930