गुन्हे शाखेची धडक कारवाई : आरोपीकडून पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
गुन्हे शाखेची धडक कारवाई : आरोपीकडून पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त
पुणे, दि. २७ : पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-२ने आंबेगाव पठार परिसरात कारवाई करत एका आरोपीकडून बेकायदेशीररीत्या बाळगलेले एक पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त केली. या कारवाईत एकूण ४० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ जून रोजी गुन्हे शाखा युनिट-२चे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी व त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार शिवानंद कायगुडे आणि उज्ज्वल मोकाशी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. शिव कॉलनी, गट क्रमांक ३, आंबेगाव पठार येथे एक व्यक्ती बेकायदेशीरपणे अग्निशस्त्र बाळगून थांबल्याची माहिती मिळताच प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या आदेशानुसार पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
तेथे दिनेश सुरेश ढोरे (वय ३८, रा. शिव कॉलनी, गट क्र. २, आंबेगाव पठार, पुणे) याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या शस्त्रांसह एकूण ४०,८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५०/२०२६ दाखल करण्यात आला असून शस्त्र अधिनियम कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३), १३५ अन्वये आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, तेजश्री पवार तसेच गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा





