नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , सीड बॉल वाटून राहुल गांधींचा वाढदिवस साजरा….. – जन समाचार लाइव 24

सीड बॉल वाटून राहुल गांधींचा वाढदिवस साजरा…..

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

सीड बॉल वाटून राहुल गांधींचा वाढदिवस साजरा…..

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसकडून ‘सीड बॉल’ वाटप; ५ हजार सीड बॉल शाळांमध्ये वाटपाचा संकल्प

पुणे, दि. १९ जून : भारताचे सक्षम विरोधी पक्षनेते तथा खासदार मा. राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेस, पुणे शहर यांच्या वतीने अभिनव चौक, टिळक रोड येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा ‘सीड बॉल (बीज चेंडू) वाटप’ उपक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमात लहान मुलांच्या हस्ते तयार करण्यात आलेल्या सीड बॉलचे नागरिकांना वाटप करण्यात आले. वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमास पुणे शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष मा. प्रशांतदादा जगताप (पूर्व), शहराध्यक्ष मा. दीप्तीताई चौधरी (पश्चिम), युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मा. सौरभदादा अमराळे, ज्येष्ठ काँग्रेस नेते द. स. पोळेकर, महिला काँग्रेस शहराध्यक्ष मा. स्वातीताई शिंदे, महाराष्ट्र प्रदेश वाहतूक परिवहन उपाध्यक्षा मा. मनिषाताई फाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) क्रीडा शहराध्यक्ष मा. मदन कोठुळे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे शहर प्रसिद्धीप्रमुख मा. अनंत घरत, कसबा विधानसभा अध्यक्ष मा. प्रवीणनाना करपे, प्रतीक उर्फ बाळा अल्हाट, राकेशदादा नामेकर, नंदूनाना वीर, अविनाशदादा कंधारे, महेशदादा शिंदे, राजाभाऊ पाथरकर, रोहनदादा पायगुडे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे खजिनदार मा. अक्षयदादा जैन, उपाध्यक्ष मा. प्रथमेशदादा अबनावे, मा. मेघश्याम धर्मावत, इम्रान पठाण, सद्दाम शेख, गौरव बाळंदे, यश कोलते, विक्रम धोत्रे, मंथन सपकाळ, शुभम लाड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुणे शहर काँग्रेसचे पदाधिकारी, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने पुणेकर नागरिकांनी सहभाग नोंदवत उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या उपक्रमासाठी समीरदादा धाडगे आणि मंजिरीताई धाडगे यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाचे आयोजन सागर धाडवे (सरचिटणीस, युवक काँग्रेस, पुणे शहर) यांनी केले.
यावेळी सागर धाडवे म्हणाले, “राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आलेल्या या पर्यावरणपूरक उपक्रमाअंतर्गत पुणे शहरातील विविध शाळांमध्ये ५ हजार सीड बॉलचे वाटप करण्यात येणार आहे. लहान मुलांच्या हाताने तयार करण्यात आलेले हे सीड बॉल पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि हिरवाई वाढविण्यास निश्चितच हातभार लावतील. पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी युवक काँग्रेस सातत्याने अशा विधायक उपक्रमांचे आयोजन करत राहील.”

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930