नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , साहित्य सम्राट पुणे संस्थेच्या द्विशतकीय रौप्य महोत्सवी (२२५) राज्यस्तरीय साहित्य संमेलनात संगीतकार श्री शिवराज साने यांचा सत्कार – जन समाचार लाइव 24

साहित्य सम्राट पुणे संस्थेच्या द्विशतकीय रौप्य महोत्सवी (२२५) राज्यस्तरीय साहित्य संमेलनात संगीतकार श्री शिवराज साने यांचा सत्कार

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

साहित्य सम्राट पुणे संस्थेच्या द्विशतकीय रौप्य महोत्सवी (२२५) राज्यस्तरीय साहित्य संमेलनात संगीतकार श्री शिवराज साने यांचा सत्कार.

साहित्य सम्राट पुणे संस्थेचा प्रवास म्हणजे साहित्यिकांच्या चौदा वर्षाचा सहवास बागेतील गवतापासून सुरू होऊन स्मशानापर्यंत व्हाया दवाखाना, विद्यापीठ, महापालिका, शाळा कॉलेज, पदरस्ता ते स्मशानभूमी. कलावंतांची प्रतिभा, भूमिका सर्वकाळी, सर्वस्थानी समाज उपयोगी आणि संस्कृतीला जन्माला घालणारी ही प्रक्रिया आहे. त्यामुळे कुठल्याही पुढारी नेत्यापेक्षा कवी कलावंत अधिक वंदनीय वाटतो. सम्राट हा न्याय देणारा तसेच संधी देणारा असतो. असा विनोदसारखा संधी देणारा संघटक हा फार मिळत नाही. या संस्थेला कुठल्याही जातीचं जाणवं नाही. जाणवंमुक्त अशी जाणिवेची संस्था विनोद अष्टुळांनी निर्माण केली आहे. त्यामुळे संस्थेने अनेक प्रतिभावंत कवी साहित्यिक निर्माण केले आहेत. असे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात सबनीस बोलत होते.
साहित्य सम्राट पुणे या संस्थेचे द्विशतकोत्तर रौप्य महोत्सव म्हणजे २२५ वे राज्यस्तरीय संमेलन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ यांनी स्वर्गीय विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह हडपसर येथे जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित केले होते.
प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विवेकवादी विचारवंत श्रीपाल सबनीस, कवयित्री ललिता सबनीस, संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ, ज्येष्ठ साहित्यिक वि.ग.सातपुते, सूर्यकांत वैद्य, चित्रपट निर्माते संजय सिंगलवार, पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ.सुनील लोखंडे, डी.एस. एसचे दादासाहेब सोनवणे, उद्योजक संदीप रणदिवे, गझलकार मसूद पटेल आदी उपस्थित होते. संगीतकार श्री शिवराज साने यांचा व इतर उपस्थित कविंचा सन्मान संस्थेच्या आजीव सभासदांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.
संमेलनाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या पूजनाने झाली. संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन सिताराम नरके यांनी केले. वृक्षआरती लक्ष्मण शिंदे यांनी गायली. तसेच मान्यवरांचे स्वागत नानाभाऊ माळी यांनी केले आणि संमेलनाचा उद्देश प्रास्ताविकेतून अध्यक्ष विनोद अष्टुळ यांनी व्यक्त केला.
पुढे सबनीस म्हणाले की या संस्थेत प्रत्येक सामान्य माणूस कवी कलावंत सम्राट झालेला आहे. येथे संमेलनाची सुरुवात संविधान पूजनाने झालेली आहे. शिवाजी महाराज ते अण्णाभाऊ साठे यामध्ये सर्व महापुरुषांचा गौरव अबाधित ठेवून महापुरुषांच्या विचारांची बेरीज एकत्र करणे म्हणजे साहित्यिक होणे होय. साहित्यिकांनी महापुरुषांना एका चौकटीत बसवता कामा नये. कविता केवळ एका धर्माची नसून सर्व धर्माला कवटाळणारी मानवतेला पोटात घालणारी, माया लावणारी, कुरवाळणारी, मानवतेला जन्माला घालणारी अशी कविता श्रेष्ठ असते. म्हणून या मंचाला धर्म नाही कुठलीही जात नाही. अशी भूमिका विनोद अष्टुळांच्या वाटचालीमधील विविध उपक्रमांद्वारे दिसून येते.
मंचावरील ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, आदरणीय सर्वच मान्यवरांनी साहित्यसम्राट समूहाचे तसेच अध्यक्ष विनोदचे भरभरून कौतुक करून मनापासून शुभेच्छा दिल्या.
यावेळी आदर्श गुणवान व्यक्तींना साहित्य सम्राटचे पुरस्कार देऊन तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.पि.डी.कदम यांचे भिकाऱ्याचे जीवन व तिन्हीसांजेला तसेच उत्साही आयुष्य सुभाष ढगे यांच्या आणि सिताराम नरके यांच्या नात्यांच्या पाऊल खुणा या काव्यसंग्रहांचे मान्यवरात शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रामध्ये राज्यस्तरीय कवी संमेलन घेण्यात आले अनेक कवी , कवयित्री यांनी आपल्या बहारदार रचना सादर करून हडपसरवासीय काव्य रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये अर्चना अष्टुळ, सुषमा रणदिवे, कन्हैया साबळे, बाळासाहेब केमकर, संजय ओसवाल आणि ओंकार अष्टुळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन उफाडे,कवी संमेलनाचे सूत्रसंचालन जगदीप वनशिव यांनी तर कार्यक्रमाचे आभार कवी संमेलनाचे अध्यक्ष म.भा.चव्हाण यांनी व्यक्त केले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031