नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , थेऊरच्या अजय विजय वाघमारे यांची व्हिएतनाममधील आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी निवड – जन समाचार लाइव 24

थेऊरच्या अजय विजय वाघमारे यांची व्हिएतनाममधील आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी निवड

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

थेऊरच्या अजय विजय वाघमारे यांची व्हिएतनाममधील आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी निवड

थेऊर, प्रतिनिधी :
थेऊर येथील युवा कलाकार अजय विजय वाघमारे यांनी कला क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत खुल्या गटातील नृत्य स्पर्धेत तृतीय क्रमांक तर एकपात्री अभिनय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांची व्हिएतनाम येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

अजय यांना नृत्य क्षेत्रात नटराज डान्स अकादमीचे प्रमुख सुयश सुरवसे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच एकपात्री अभिनयासाठी संध्यादीप, पुणे येथील संदीप पंडित सर यांनी विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अजय यांनी राज्यस्तरीय व्यासपीठावर उल्लेखनीय यश मिळविले.

ही स्पर्धा अखिल लोककला कल्चरल ऑर्गनायझेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. संस्थेचे सचिव डॉ. प्रमोद ननावरे गेल्या दहा वर्षांपासून या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करत आहेत. पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत देशाच्या कानाकोपऱ्यातील हजारो कलाकार सहभागी होतात. नृत्य, नाटक, संगीत, गायन यांसारख्या विविध कलांचा संगम या व्यासपीठावर अनुभवायला मिळतो.

स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण समारंभ कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे उत्साहात पार पडला. यावेळी इंडियाज बेस्ट डान्सर पर्व ३ चे विजेते समर्पण लामा यांची प्रमुख उपस्थिती होती.

अजय वाघमारे यांच्या या यशाबद्दल संध्यादीप परिवारासह सर्व स्पर्धकांनी त्यांचे अभिनंदन केले असून, व्हिएतनाम येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. थेऊर परिसरातूनही त्यांच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031