नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , बेलसर टोल नाक्यावरून प्रवास करणाऱ्या पीएमपीएमएल प्रवाशांकडून टोल तिकीट आकारणी – जन समाचार लाइव 24

बेलसर टोल नाक्यावरून प्रवास करणाऱ्या पीएमपीएमएल प्रवाशांकडून टोल तिकीट आकारणी

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

बेलसर टोल नाक्यावरून प्रवास करणाऱ्या पीएमपीएमएल प्रवाशांकडून टोल तिकीट आकारणी

पुरंदर, प्रतिनिधी : सासवड-लोणंद मार्गावरील बेलसर (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील टोल प्लाझा २४ एप्रिल २०२६ पासून कार्यान्वित झाला असून, या मार्गावरून धावणाऱ्या पीएमपीएमएल बसांना पथकर (टोल टॅक्स) आकारला जात आहे. त्यामुळे संबंधित बससेवांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडूनही टोल तिकीट आकारणी करण्यात येणार असल्याची माहिती पीएमपीएमएल प्रशासनाने दिली आहे.

पीएमपीएमएलच्या विविध डेपोंमधील बसेस ज्या टोल नाक्यांवरून प्रवास करतात, त्या बसेसमधील प्रवाशांकडून प्रति प्रवासी रु. १ (एक रुपये) प्रमाणे टोल तिकीट आकारले जाते. त्याच धर्तीवर बेलसर टोल प्लाझा मार्गे प्रवास करणाऱ्या बस प्रवाशांकडूनही प्रति प्रवासी रु. १ टोल तिकीट आकारणी केली जाणार आहे.

ही आकारणी खालील बसमार्गांवरील प्रवाशांसाठी लागू राहणार आहे :

  • बसमार्ग क्र. २१० : हडपसर ते जेजुरी एमआयडीसी
  • बसमार्ग क्र. २१२ : हडपसर ते मोरगाव
  • बसमार्ग क्र. २१३ : हडपसर ते निरा गाव

पीएमपीएमएल प्रशासनाने संबंधित प्रवाशांना टोल तिकीट आकारणीबाबत माहिती घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

बेलसर टोल प्लाझा सुरू झाल्यानंतर या मार्गावरील सार्वजनिक वाहतूक सेवांवर त्याचा परिणाम झाला असून, प्रवाशांनी टोल शुल्काबाबत गैरसमज न ठेवता नियमानुसार आकारण्यात येणारे शुल्क भरावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930