नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , सहजपूर–नांदूर–खामगाव रस्त्यावरील खड्ड्यांवरून आंदोलन तीव्र – जन समाचार लाइव 24

सहजपूर–नांदूर–खामगाव रस्त्यावरील खड्ड्यांवरून आंदोलन तीव्र

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

सहजपूर–नांदूर–खामगाव रस्त्यावरील खड्ड्यांवरून आंदोलन तीव्र

उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उमेशभैय्या म्हेत्रे यांचे अर्धनग्न आंदोलन

यवत : सहजपूर फाटा, नांदूर आणि खामगाव मार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत असून, रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते उमेशभैय्या म्हेत्रे यांनी २५ मेपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा तिसरा दिवस असून आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार “आज करतो, उद्या करतो” अशी टोलवाटोलवी होत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. रस्त्यावरील गुडघाभर खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघातांचाही धोका वाढला असल्याचे नागरिकांनी सांगितले.

उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उमेशभैय्या म्हेत्रे यांनी अर्धनग्न आंदोलन सुरू केले. तसेच दुपारनंतर आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करत “भिक मागो आंदोलन” करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

“सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता दुरुस्तीसाठी निधी नसेल, तर आम्ही सामान्य नागरिकांकडून ५, १०, ५०, १००, २०० आणि ५०० रुपयांचा स्वेच्छा निधी जमा करून तो यवत सार्वजनिक बांधकाम विभागाला दान देणार आहोत,” असा उपरोधिक इशारा आंदोलकांनी दिला.

दरम्यान, या आंदोलनामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930