भिमथडी साहित्य संमेलनात संगीतकार शिवराज साने यांचा सन्मान
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
भिमथडी साहित्य संमेलनात संगीतकार शिवराज साने यांचा सन्मान
शनिवार दिनांक २३ मे २०२६ रोजी बोरमलनाथ मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या भिमथडी साहित्य संमेलनात प्रसिद्ध संगीतकार श्री शिवराज साने यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संगीत क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला.
या संमेलनास दौंड तालुक्याचे कार्यशील आमदार अॅड. राहुलदादा कुल यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक श्री सुरज पवार यांची निवड करण्यात आली होती. त्यांच्या हस्ते श्री शिवराज साने यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये सैराट फेम अभिनेते प्रिन्स, प्रा. फ. शिंदे, ज्येष्ठ कवयित्री सौ. सुवर्णा वाघमारे, सुप्रसिद्ध कवी प्रा. सुरेश वाळेकर आदींचा समावेश होता.
भिमथडी साहित्य संमेलनाचे आयोजन ज्येष्ठ साहित्यिक श्री दशरथ यादव, संदेश सोनवणे आणि दीपक पवार यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्वाती बंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ कवयित्री सौ. सुवर्णा वाघमारे यांनी केले.
संगीतकार श्री शिवराज साने यांच्या सन्मानामुळे संमेलनाचा उत्साह अधिक वाढला असून उपस्थितांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा





