नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , हवेली पंचायत समिती इमारती दुरुस्तीसाठी, आमदार ज्ञानेश्वर कटके व भीमराव तापकीर यांनकडून, प्रत्येकी 10 लक्ष निधी मंजूर. – जन समाचार लाइव 24

हवेली पंचायत समिती इमारती दुरुस्तीसाठी, आमदार ज्ञानेश्वर कटके व भीमराव तापकीर यांनकडून, प्रत्येकी 10 लक्ष निधी मंजूर.

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

हवेली पंचायत समिती इमारती दुरुस्तीसाठी, आमदार ज्ञानेश्वर कटके व भीमराव तापकीर यांनकडून, प्रत्येकी 10 लक्ष निधी मंजूर.

पुणे; राज्यात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या, हवेली तालुका पंचायत समितीचा कारभार हा गेली अनेक वर्षांपासून, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील, जुन्या जिल्हा परिषद इमारतीतून हाकला जातो. या इमारतीची सध्या दुरवस्था झाली आहे. येथील सभागृह व विविध विभाग हे दुरुस्तीस आल्याने पदाधिकारी, कर्मचारी व अभ्यागतांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे.
मागील 15/20 दिवसांपूर्वी आमदार ज्ञानेश्वर कटके व आमदार भीमराव तापकीर यांनी तालुका स्थरीय पाणी टंचाई व पाणंद रस्त्यांची आढावा बैठक, येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केली होती. यावेळी येथील सभागृहातील माईक साऊंड सिस्टमसह इतर गोष्टींची दुरवस्था असल्याने आमदार कटके व तापकीर यांनी, हवेलीचे सभापती युवराज काकडे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. यावेळी काकडे यांनी, जिल्हा नियोजन समितीकडे इमारत दुरुस्तीसाठी, निधीची मागणी केली असल्याचे सांगितले.
यावेळी हवेलीचे आमदार यानात्याने आमदार ज्ञानेश्वर कटके व भिमराव तापकीर यांना ‘आमदार निधीतून’ काही निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सभापती काकडे यांनी केली होती. यास दोनही आमदार महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत, प्रत्येकी 10/10 लक्ष निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे हवेली पंचायत समितीची इमारत दुरुस्त होऊन, पदाधिकारी, कर्मचारी व अभ्यागतांना दिलासा मिळणार आहे.
सभापती युवराज काकडे यांनी दोनही आमदार महोदयांचे आभार मानले आहेत. लवकरच इमारत दुरुस्तीचे काम हाती घेणार असून, अद्यायावत कोनशिलेसह कामाचे भूमिपूजन, आमदार ज्ञानेश्वर कटके व आमदार भीमराव तापकीर यांच्या शुभहस्ते करणार असल्याचे काकडे यांनी सांगितले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930