नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , मसाज पार्लरवर खोट्या कारवाईची धमकी देत २ लाखांची खंडणी उकळणाऱ्या पाच जणांना अटक – जन समाचार लाइव 24

मसाज पार्लरवर खोट्या कारवाईची धमकी देत २ लाखांची खंडणी उकळणाऱ्या पाच जणांना अटक

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

मसाज पार्लरवर खोट्या कारवाईची धमकी देत २ लाखांची खंडणी उकळणाऱ्या पाच जणांना अटक
पुणे : खराडी परिसरातील एका मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याचा बनाव करून स्पा चालकाला धमकावत तब्बल २ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पाच आरोपींना खराडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून ३० हजार रुपये रोख रक्कम व एक होंडा अॅक्टीव्हा दुचाकी असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
खराडी पोलीस स्टेशन हद्दीत सिटी व्हिस्टा बिल्डिंग येथील ‘फिल टच स्पा’मध्ये १३ मे २०२६ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास तीन पुरुष आणि दोन महिला घुसल्या. त्यांनी स्पामध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा आरोप करत स्पा चालकाला दमदाटी व शिवीगाळ केली. तसेच “तुमच्यावर पोलीस केस दाखल करतो” अशी धमकी देत सुरुवातीला २ लाख रुपयांची खंडणी मागितली.
फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर तडजोडीअंती दीड लाख रुपयांवर व्यवहार ठरवून त्यापैकी ३० हजार रुपये ऑनलाईन स्वरूपात उकळले. तसेच “वेश्याव्यवसायाचा खोटा गुन्हा दाखल करू” अशी धमकीही आरोपींनी दिली. याप्रकरणी १४ मे रोजी खराडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक १६१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८ (२), ३०८ (३), ३०८ (७), ११५ (२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
खंडणीच्या गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्याची दखल घेत पोलीस उपआयुक्त परिमंडळ ७ श्री. सोमय मुंडे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय चव्हाण यांना गुन्हा तातडीने उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. चंद्रसेन पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे आणि पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे यांच्या नेतृत्वाखाली दोन तपास पथके तयार करण्यात आली.
तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच गुप्त माहितीच्या आधारे आरोपी प्रतीक जयवंत गायकवाड (वय ३१, रा. केसनंद) याला केसनंद फाटा, वाघोली येथून सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर विशाल अशोक साळवे (वय ४०, रा. विश्रांतवाडी), रोहित नागनाथ मांढरे (वय ३२, रा. येरवडा) तसेच दोन महिला आरोपींना अटक करण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोजकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त श्री. सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त श्रीमती नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक श्री. चंद्रसेन पालकर, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे तसेच पोलीस अंमलदार मनोज खरपुडे, महेश नाणेकर, श्रीकांत शेंडे, साहेबराव गुंडाळे, अशोक केदार, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव आणि विलास केदारी यांनी केली

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031