नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , साने संगीत लोककला मंच ऊरूळी कांचन यांना राज्यस्तरीय संगीत पुरस्कार – जन समाचार लाइव 24

साने संगीत लोककला मंच ऊरूळी कांचन यांना राज्यस्तरीय संगीत पुरस्कार

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

साने संगीत लोककला मंच ऊरूळी कांचन यांना राज्यस्तरीय संगीत पुरस्कार
पुणे, दि. 10 मे 2026 : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, कला गोविंद शिक्षण प्रसारक मंडळ व पोलिस मित्र संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आठवे कवी संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळा 2026 उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम पुणे जिल्ह्यातील ऊरूळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या रविंद्र कला मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पोलीस पदक विजेते, अभिनेते व सुप्रसिद्ध कवी श्री. सिताराम नरके उपस्थित होते. दीपप्रज्वलन व महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाला महात्मा गांधी सर्वोदय संघाचे सचिव श्री. सोपान (बापू) कांचन, विश्वस्त श्री. महादेव कांचन, श्री. राजाराम कांचन, ज्येष्ठ साहित्यिक श्री. सुर्यकांत नामुगडे, शिक्षण व क्रीडा जिल्हा परिषद पुणे सदस्य सौ. सुरेखा हरगुडे, महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य श्री. भरत भोसले, कवी व संगीतकार श्री. सतीश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. साने संगीत क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीतासह अभंग, गवळण, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा तसेच मराठी व हिंदी गीतांचे उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली.
संस्कृती अंधारे, सोनाली सुकाळ, संकेत खंडागळे, आदित्य लोखंडे, वैष्णवी साळुंखे, आरोही साळुंखे, श्रीशा काकडे, काळूराम जाधव, सुयश घनवट आणि हर्षद बोबडे या विद्यार्थ्यांनी गायन-वादन क्षेत्रातील उत्कृष्ट कला सादर केल्याबद्दल त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी उपस्थित कवींनी स्वरचित कविता सादर केल्या. कवी संमेलनाच्या औचित्याने संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल श्री. शिवराज साने यांना “संगीत रत्न पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
श्री. शिवराज साने यांनी व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंध, आरोग्य जनजागृती, हुंडाबंदी यांसारख्या सामाजिक विषयांवर लोकगीते, भारुडे आणि महापुरुषांच्या कार्याचा गीतातून गौरव करत समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना उत्कृष्ट संगीतकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे जिल्हाध्यक्ष तथा पोलिस मित्र संघ महाराष्ट्र राज्याचे विभागीय अध्यक्ष श्री. सुरेश वाळेकर यांनी केले. सूत्रसंचालन अॅड. उमाकांत अदमाने यांनी केले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930