नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , थेऊरफाटा उड्डाणपुलाला पडले खोल भगदाड, तात्काळ दुरुस्तीसह पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची, सभापती युवराज काकडे यांची मागणी. – जन समाचार लाइव 24

थेऊरफाटा उड्डाणपुलाला पडले खोल भगदाड, तात्काळ दुरुस्तीसह पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची, सभापती युवराज काकडे यांची मागणी.

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

थेऊरफाटा उड्डाणपुलाला पडले खोल भगदाड, तात्काळ दुरुस्तीसह पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची, सभापती युवराज काकडे यांची मागणी.

थेऊरफाटा ते थेऊर रस्त्यावर असलेल्या, उड्डाणपुलाला तब्बल 5 ते 10 फुटांचे खोल भगदाड पडले आहे, तसेच काही ठिकाणी भिंतींना तडेही गेल्याचे निदर्शनास आल्याने, हवेली पंचायत समितीचे सभापती श्री. युवराज हिरामण काकडे यांनी तात्काळ पुलाची पाहणी करून, भगदाडाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून बॅरीगेट लावले आहे.
यावेळी पडलेल्या भगदाडाच्या पाहणी दरम्यान पुलाच्या भिंतींना तडे गेल्याची गंभीर बाब समोर आल्याने, सभापती काकडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, विशेष रस्ते प्रकल्प, पुणे यांच्याकडे, उड्डाणपुलाचे लवकरात लवकर स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा होत असल्यामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशा सुचना संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून केल्या आहेत.
थेऊरला येणाऱ्या भाविकभक्तांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. तसेच पुणे- सोलापूर हायवे व पुणे- नगर हायवे या 2 महामार्गांना जोडणारा हा रस्ता असल्याने, या उड्डाणपुलावरून खूप मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक जाते आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ दुरुस्ती करावी. या पुलाखाली रेल्वे लाईन असल्याने, भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे काही अघटित घडल्यास, यास सार्वजनिक बांधकाम विभाग सर्वस्वी जबाबदार असेल, असे मत यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी यावेळी व्यक्त केले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031