नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , चैन स्नॅचींग करणाऱ्या दोघांना अवघ्या ८ तासांत पोलिसांनी घेतले ताब्यात – जन समाचार लाइव 24

चैन स्नॅचींग करणाऱ्या दोघांना अवघ्या ८ तासांत पोलिसांनी घेतले ताब्यात

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

चैन स्नॅचींग करणाऱ्या दोघांना अवघ्या ८ तासांत पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे : लोहगाव परिसरात महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन व मोबाईल हिसकावून पळालेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट-७ ने अवघ्या ८ तासांत ताब्यात घेत कारवाई केली आहे.
दिनांक २ मे २०२६ रोजी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास कलवड वस्ती, गणराज चौक, लोहगाव येथे एक महिला पायी जात असताना दोन अज्ञात इसमांनी तिच्या गळ्यातील सोन्याची चैन तसेच मोबाईल फोन हिसकावून चोरी केली. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट-७ च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती कांचन जाधव यांनी तात्काळ तपास पथक रवाना केले.
सपोनि मदन कांबळे, पोलीस अंमलदार विनायक साळवे, निलेश साळवे, प्रशांत कापुरे व ऋषीकेश ताकवणे यांच्या पथकाने घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. फुटेजमधून आरोपींचे फोटो मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे
१) हाशिम खलील शेख (वय २०, रा. कलवड वस्ती, गणराज चौकाजवळ, शिफा हॉस्पिटल मागे, लोहगाव, पुणे)
२) आसिफ इक्बाल शेख (वय १९, रा. कलवड वस्ती, गणराज चौकाजवळ, शिफा हॉस्पिटल मागे, लोहगाव, पुणे) अशी आहेत.
या प्रकरणी लोहगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ५३/२०२६ अन्वये भा.न्या.सं. कलम ३०९(६), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींकडून १० हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती कांचन जाधव यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत सपोनि मदन कांबळे, पोलीस अंमलदार विनायक साळवे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, ऋषीकेश ताकवणे तसेच महिला पोलीस अंमलदार सोनाली नरवडे यांनी सहभाग घेतला.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930