बारावी बोर्ड परीक्षेत महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचा उल्लेखनीय निकाल
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
बारावी बोर्ड परीक्षेत महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचा उल्लेखनीय निकाल
प्रतिनिधी : माढा
फेब्रुवारी/मार्च 2026 मध्ये झालेल्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत कुर्डूवाडी येथील महात्मा ज्योतिबा फुले उच्च माध्यमिक विज्ञान व कला प्रशाला, नगरपरिषद कुर्डूवाडी विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल 95.97 टक्के तर कला शाखेचा निकाल 73.97 टक्के लागला आहे.
विज्ञान शाखेत कु. गोरे भक्ती संतोष हिने 78 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कु. बागवान जिया समीर हिने 77 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर रिगुडे शिवराज भगवान याने 73.83 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.
कला शाखेत कु. पाटील उत्कर्षा किशोर हिने 68.50 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. कु. कनकधर निशा दिनेश हिने 66.50 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक पटकावला, तर कु. पवार आकांक्षा अनिल हिने 66 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.
या यशाबद्दल कुर्डूवाडीच्या नगराध्यक्ष जयश्री भिसे, उपनगराध्यक्ष सविता जगताप, शालेय समिती सभापती संजय टोणपे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन तपसे तसेच प्राचार्य रोहिदास सोनवणे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





