नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , क्रेनमधील ५.६० लाखांच्या बॅटरी चोरीचा उलगडा; ०५ तासांत तीन आरोपी जेरबंद – जन समाचार लाइव 24

क्रेनमधील ५.६० लाखांच्या बॅटरी चोरीचा उलगडा; ०५ तासांत तीन आरोपी जेरबंद

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

क्रेनमधील ५.६० लाखांच्या बॅटरी चोरीचा उलगडा; ०५ तासांत तीन आरोपी जेरबंद
पुणे : बाणेर परिसरातील दोन क्रेनमधून तब्बल ५ लाख ६० हजार रुपयांच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांना बाणेर पोलिसांनी अवघ्या ०५ तासांत अटक करत चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील वाहन चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे.
बाणेर पोलीस ठाण्यात गु.र.नं. १२२/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०३ (२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांनी त्यांच्या दोन क्रेन विजय सेल्स, बाणेर रोड येथील पेट्रोल पंपाजवळ लॉक करून उभ्या केल्या होत्या. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी क्रेनमधील टॉरझन कंपनीच्या ४८ व्होल्ट क्षमतेच्या १६ बॅटऱ्या चोरी करून नेल्या. प्रत्येक बॅटरीची किंमत ३५ हजार रुपये असून एकूण ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता.
गुन्ह्याचा तपास करताना बाणेर पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील तसेच विविध भागांतील तब्बल १२५ सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलीस अंमलदार बाबा आहेर, किसन शिंगे आणि अतुल इंगळे यांनी संशयित आरोपींचा माग काढत ते औंध येथील इंदिरा वसाहत परिसरातील असल्याचे निष्पन्न केले.
त्यानुसार पोलिसांनी
१) सुनिल नवनाथ लोखंडे (वय ३०, रा. आंबेडकर चौक, इंदिरा वसाहत, औंध)
२) साहिल अशोक माने (वय २१, रा. हनुमान मंदिरामागे, इंदिरा वसाहत, औंध)
३) अक्षय शहाजी बोराडे (वय २८, रा. साईबाबा मंदिराजवळ, इंदिरा वसाहत, औंध)
यांना अटक केली. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून चोरीस गेलेल्या बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या असून साहिल माने आणि अक्षय बोराडे यांच्याकडून चोरीच्या बॅटऱ्या विकून मिळालेले १६ हजार रुपये रोखही जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक के. बी. डाबेराव करीत आहेत.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ४ युलूमुला रजनिकांत, सहायक पोलीस आयुक्त खडकी विभाग विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अलका सरग, सपोनि के बी डाबेराव तसेच गणेश रायकर, गणेश गायकवाड, बाबा आहेर, किसन शिंगे, संदेश निकाळजे, अतुल इंगळे, खरात, गजानन अवातिरक, शरद राऊत, स्वप्नील मराठे, गणेश भोईने आणि समीर पवार यांच्या पथकाने केली.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930