मॅफेड्रॉन ड्रग्ज (एम.डी.) विक्री प्रकरणी ६ आरोपी जेरबंद लोणीकंद पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ३४ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
मॅफेड्रॉन ड्रग्ज (एम.डी.) विक्री प्रकरणी ६ आरोपी जेरबंद
लोणीकंद पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ३४ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
पुणे : अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत लोणीकंद पोलिसांनी मोठी कारवाई करत मॅफेड्रॉन ड्रग्ज (एम.डी.) पावडर विक्री करणाऱ्या एकूण ६ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १७४.९५ ग्रॅम एम.डी. ड्रग्जसह कार, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ३४ लाख ९८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मा. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सुनिता रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक कार्यरत होते. दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर कटकेवाडी फाटा, लोणीकंद येथे सापळा रचण्यात आला.
या कारवाईत पुंजाजी जयचंद्र चौधरी (वय ४०, रा. वाघोली, पुणे) याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून २१.८६० ग्रॅम एम.डी. पावडर, आयफोन मोबाईल असा ४ लाख ८७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यानंतर २० एप्रिल रोजी पेरणे फाटा येथे राजेंद्र केरु टेळे (वय ३५) व करण सचिन मोहिते (वय २१) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून ५९.१६० ग्रॅम एम.डी. पावडर, कार, मोबाईल आणि रोख रक्कम असा तब्बल १४ लाख १० हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पुढील तपासात २२ एप्रिल रोजी मगर वस्ती, लोणीकंद परिसरातून भागीरथसिंग सज्जनसिंग राजपुरोहित (वय २८) आणि आदिनाथ दशरथ शिर्के (वय २९) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून २१.४३० ग्रॅम एम.डी. पावडर, कार, मोबाईल व रोख रक्कम असा ८ लाख ३४ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास करत २३ एप्रिल रोजी योगेश लक्ष्मण चव्हाण (वय ३७, रा. शिरवळ, सातारा) याला अटक केली. त्याच्याकडून ७२.५०० ग्रॅम एम.डी. पावडर जप्त करण्यात आली असून त्याची किंमत १४ लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या संपूर्ण कारवाईत एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आली असून १७५ ग्रॅम एम.डी. ड्रग्जसह ४१ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोजकुमार पाटील, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ ७ श्री. सोमय मुंडे आणि मा. सहाय्यक पोलीस आयुक्त लोणीकंद विभाग श्रीमती नुतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सुनिता रोकडे तसेच तपास पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





