नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , ६ वर्षांपासून फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात! – जन समाचार लाइव 24

६ वर्षांपासून फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात!

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

६ वर्षांपासून फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात!
पुणे शहरातील चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील ६ वर्षांपासून फरार असलेला मुख्य आरोपी अखेर पोलिसांनी अटक केला आहे. तेजस अमृत ढेरे (वय ३६, रा. मुंढवा रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सदर प्रकरणात गु.र. नं. १८८/२०१९ अंतर्गत भा.दं.वि. कलम ३९५, ३९६, ३६४, ३४२, ३२३, ५०६, २०१ तसेच आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात एकूण ८ आरोपी सहभागी होते. आरोपींनी फिर्यादीकडून जबरदस्तीने मोबाईल, सोन्याची चैन, ब्रेसलेट, घड्याळ आणि चारचाकी वाहन असा सुमारे ३.६५ लाखांचा मुद्देमाल लुटला होता.
तपासादरम्यान आरोपींनी फिर्यादीसोबत असलेल्या राहुल शिवाजी शेलार (वय २४, रा. सातारा) याचे अपहरण करून खराडी येथील कॉर्नेट लॉजमधून बाहेर नेले आणि त्याच्यावर हल्ला करून त्याचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह नदीत फेकण्यात आला होता. यामुळे गुन्ह्यात भा.दं.वि. कलम ३९६ व २०१ ची भर घालण्यात आली.
या प्रकरणात आतापर्यंत ७ आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र मुख्य आरोपी तेजस ढेरे हा गेली ६ वर्षे फरार होता. त्याच्यावर पुणे शहर व ग्रामीण भागातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये खूनाचा प्रयत्न, दरोडा, आर्म अॅक्ट व मोक्का अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सापळा रचून अटक
दि. २५ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास खराडी पोलीस स्टेशनच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की आरोपी खराडी परिसरात येणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी उबाळे नगर परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
अटकेवेळी आरोपीकडून सॅन्ट्रो कार (एमएच-०५/एबी-२६०४) जप्त करण्यात आली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीने चौकशीत अखेर ६ वर्षे फरार असल्याची कबुली दिली.
सदर आरोपीस पुढील कारवाईसाठी चंदननगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीसांचे कौतुकास्पद कामगिरी
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोजकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त सोमय मुंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्यासह तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031