नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २४ तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या – जन समाचार लाइव 24

लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २४ तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २४ तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या
पुणे : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने वेगवान आणि तत्पर कारवाई करत मांजरी पोलीस ठाणे हद्दीतील एका इसमावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या तीन आरोपींना अवघ्या २४ तासांच्या आत ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून धारदार हत्यारे व दुचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी दिनांक १८ ते २४ एप्रिल २०२६ दरम्यान राबविलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. लोणी काळभोर परिसरात पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, टोल नाका परिसरात २ ते ३ इसम धारदार हत्यारे घेऊन फिरत आहेत. या माहितीच्या आधारे तपास पथक, चौकी अधिकारी आणि बीट मार्शल यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवली.
यावेळी पोलिसांनी
सुरेश बाबुराव गायकवाड (वय १८),
कुणाल राहुल चौगुले (वय १८),
तसेच एका १७ वर्षीय विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनी सोलापूर रोडवरील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ गणेश नवनाथ कार्बळे यांच्यावर धारदार हत्याराने वार करून पळून जात असल्याची कबुली दिली. जखमी कार्बळे यांच्यावर उपचार सुरू असून मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजले.
या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गु.र.नं. १६७/२०२६ अंतर्गत भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ आणि भारतीय न्यायसंहिता कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मांजरी पोलीस ठाण्यातील गु.र.नं. २४/२०२६ हा गंभीर गुन्हाही उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस उपआयुक्त परिमंडळ ६ डॉ. राजकुमार शिंदे आणि सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, प्रल्हाद जगताप तसेच त्यांच्या पथकाने केली.
या कारवाईमुळे परिसरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांनी वचक बसवला असून नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930