साने कला मंचाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
साने कला मंचाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
उरुळी कांचन (प्रतिनिधी): B. R. Ambedkar यांच्या जयंतीनिमित्त साने संगीत क्लासेस व साने कला मंच यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी पर्यवेक्षक बाळकृष्ण काकडे म्हणाले की, चवदार तळ्याचे पाणी पिऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ तहान भागवली नाही, तर शतकानुशतके चालत आलेल्या अस्पृश्यतेच्या बेड्या तोडण्याचा ऐतिहासिक प्रारंभ केला. त्यांच्या कार्यामुळे समाजाला समानतेचा आणि स्वाभिमानाचा मार्ग मिळाला.
माजी शिक्षणाधिकारी प्रभाकर खरात यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, भारतीय संविधानाचे शिल्पकार, दीन-दुबळ्यांच्या हक्कांसाठी लढणारे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते आणि भारतरत्न B. R. Ambedkar यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन.
कार्यक्रमाला पंचायत समितीच्या माजी उपसभापती हेमलता बडेकर, पंचायत समिती सदस्या कोमल गणेश कांबळे, माजी शिक्षणाधिकारी प्रभाकर खरात, माजी पर्यवेक्षक बाळकृष्ण काकडे, पुणे जिल्हा महानुभाव परिषदेचे प्रचारमंत्री अमोल भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे पुणे जिल्हाध्यक्ष विजय तुपे, प्रा. सुरेश वाळेकर, पत्रकार सुवर्णा कांचन, सुनिल तुपे, साने कला मंचाच्या अध्यक्षा रेखा साने, पंकज लोंढे तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव शिवराज साने यांनी केले. त्यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षण, संघर्ष आणि जिद्दीच्या जोरावर मोठे यश संपादन केले. संकटांच्या काळात ते कधीही खचले नाहीत, तर लढत राहिले. म्हणूनच त्यांचे कार्य आजही जगभर प्रेरणादायी आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल भोसले यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुनिल तुपे यांनी मानले.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





