नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , एम.डी. ड्रग्ज विक्री करणारे दोन आरोपी अटक; वाघोली पोलिसांची कारवाई, ३१.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त – जन समाचार लाइव 24

एम.डी. ड्रग्ज विक्री करणारे दोन आरोपी अटक; वाघोली पोलिसांची कारवाई, ३१.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

एम.डी. ड्रग्ज विक्री करणारे दोन आरोपी अटक; वाघोली पोलिसांची कारवाई, ३१.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : शहरात अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत वाघोली पोलिसांनी मोठी कारवाई करत एम.डी. (मॅफेड्रॉन) ड्रग्जची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत ३७ ग्रॅम ३ मिलीग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) पावडर, दोन कार, एक दुचाकी व मोबाईल असा एकूण ३१ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीचे समूळ उच्चाटन करण्याबाबत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस उपआयुक्त परीमंडळ ७ सोमय मुंडे, लोणीकंद विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त नूतन पवार तसेच वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
दि. ५ एप्रिल २०२६ रोजी गुन्हे प्रतिबंधक पथक पेट्रोलिंग करत असताना आशियाना लॉजजवळ, सातव वस्ती रोड, वाघोली येथील मोकळ्या जागेत एक संशयित इसम कारसह उभा असल्याचे पोलीस हवालदार प्रदीप मोटे व पोलीस शिपाई विशाल गायकवाड यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो घाईगडबडीत निघून जाण्याचा प्रयत्न करू लागल्याने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली.
चौकशीत त्याने आपले नाव योगेश सुभाष कणगरे (वय ३८, रा. रूम नं. ३, शिवकृपा बिल्डिंग, लेन नं. ३, साईनगर, लोहगाव, पुणे, मूळ गाव – माळी घोगरगाव, ता. वैजापूर, जि. संभाजीनगर) असे सांगितले. त्याच्या अंगझडतीत १,०८,००० रुपये किमतीची ५ ग्रॅम ४ मिलीग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) पावडर व ३ लाख रुपये किमतीची चारचाकी गाडी असा मुद्देमाल आढळून आला. त्यानुसार गु.र.नं. २२१/२०२६ नोंदवून एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (क) व २१ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान आरोपी योगेश कणगरे याने ही एम.डी. पावडर आपल्या मित्रांकडून घेतल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी सोनू सिंह उर्फ मनुवेंद्र उर्फ सोनू शंकर सिंह (वय ४२, रा. फ्लॅट नं. १, यशश्री शगुन, सर्व्हे नं. ३४/१, विद्यानगर, गुडविल रेसिडेन्सी, लेन नं. १३, टिंगरेनगर, पुणे) याचा शोध घेऊन त्याला अटक केली.
त्याच्या अंगझडतीत १,७४,००० रुपये किमतीची ८ ग्रॅम ७ मिलीग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) पावडर, ५०,००० रुपये किमतीची होंडा कंपनीची अॅक्टिव्हा दुचाकी आणि १०,००० रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान त्याच्या घर व कारची झडती घेतली असता त्याच्या राहत्या घराच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये ४,६४,००० रुपये किमतीची २३ ग्रॅम २ मिलीग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) पावडर आणि २०,००,००० रुपये किमतीची अॅडी कंपनीची कार आढळून आली. हा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला.
या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी ३७ ग्रॅम ३ मिलीग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.), दोन कार, एक दुचाकी व एक मोबाईल असा एकूण ३१,०६,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील (पूर्व प्रादेशिक विभाग), पोलीस उपआयुक्त सोमय मुंडे (परीमंडळ ७), सहायक पोलीस आयुक्त नूतन पवार (लोणीकंद विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पल्लवी मेहेर, सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे, तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे (खराडी पो.स्टे.) तसेच पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, प्रदीप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दीपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनाथ बोयणे व अमोल ढोणे (लोणीकंद पो.स्टे.) यांनी केली.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031