नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , कुर्डूवाडीतील रणजित मराळ यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती – जन समाचार लाइव 24

कुर्डूवाडीतील रणजित मराळ यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

कुर्डूवाडीतील रणजित मराळ यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती
माढा (प्रतिनिधी – कुंदन वजाळे) : जिल्ह्यातील प्रशासनिक यंत्रणा अधिक सक्षम व गतिमान करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत सोलापूर जिल्हाधिकारी यांनी माढा तालुक्यातील कुर्डूवाडी येथील रणजित दिलीप मराळ यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
ही नियुक्ती सोलापूरचे पालकमंत्री मा. जयकुमार गोरे यांच्या शिफारसीनुसार करण्यात आली असून, या निर्णयामुळे प्रशासनातील समन्वय व कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः प्रलंबित कामे मार्गी लावणे, जनतेच्या समस्या तातडीने सोडवणे तसेच विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर अधिक भर दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
रणजित मराळ यांच्या नियुक्तीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी १६ मार्च २०२६ रोजी जारी केले असून त्यांचा कार्यकाळ ३१ मार्च २०३१ पर्यंत राहणार आहे.
दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या कुर्डूवाडी मंडळाच्या सहकार्यामुळे ही नियुक्ती झाल्याचे सांगितले जात आहे. कुर्डूवाडी मंडळ अध्यक्ष अविनाश भाऊ गोरे यांनी रणजित मराळ यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930