नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणी काळभोर पोलिसांची अवैध हातभट्टी दारूवर धडक कारवाई; २.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त – जन समाचार लाइव 24

लोणी काळभोर पोलिसांची अवैध हातभट्टी दारूवर धडक कारवाई; २.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणी काळभोर पोलिसांची अवैध हातभट्टी दारूवर धडक कारवाई; २.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या मोहिमेअंतर्गत लोणी काळभोर पोलिसांनी गावठी हातभट्टी दारूच्या धंद्यावर धडक कारवाई करत तब्बल २ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून एका आरोपीला पुढील तपासात अटक करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांवर कारवाईची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
दि. ४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ९.१५ वाजता तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के व त्यांच्या पथकाने लोणी काळभोर परिसरात गस्त घालत असताना आलमगीर जामा मशीद कब्रस्तानाजवळील पत्र्याच्या शेडमध्ये संशयास्पद हालचाल दिसून आली.
तेथे तपास केला असता मुबारक जाफर गड्डे (वय ४८) व बानो मुबारक गड्डे (वय ४०), रा. पाषाणकर बाग, लोणी काळभोर हे दोघे ५०० लिटरच्या सिनटेक्स टाकीत साठवून ठेवलेली ४५० लिटर गावठी हातभट्टी दारू प्लास्टिक कॅनमध्ये भरून विक्रीसाठी अल्टो कार व दोन दुचाकींमध्ये ठेवत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपींना ताब्यात घेत ४५ हजार रुपयांची ४५० लिटर गावठी दारू, १.५० लाख रुपयांची अल्टो कार, ५० हजार रुपयांची टीव्हीएस ज्युपिटर मोपेड व ५० हजार रुपयांची होंडा अॅक्टिव्हा असा एकूण २,९५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
तपासादरम्यान ही दारू समीर संजय राठोड (वय २३, रा. शिंदवणे काळेशिवार, कंजारवस्ती, ता. हवेली) याच्याकडून घेतल्याचे आरोपींनी कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी शिंदवणे येथे जाऊन त्यालाही ताब्यात घेतले.
या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३९/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. दिगंबर सोनटक्के तसेच पोलीस कर्मचारी माने, जगदाळे, दडस, गिरी, सोनवणे व पोळ यांच्या पथकाने केली.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930