नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , हवेलीतील ग्रामपंचायतींचे प्रलंबित मुद्रांकशुल्क अनुदान तात्काळ वितरित करा; सभापती युवराज काकडे यांची जिल्हा परिषदेकडे मागणी. – जन समाचार लाइव 24

हवेलीतील ग्रामपंचायतींचे प्रलंबित मुद्रांकशुल्क अनुदान तात्काळ वितरित करा; सभापती युवराज काकडे यांची जिल्हा परिषदेकडे मागणी.

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

हवेलीतील ग्रामपंचायतींचे प्रलंबित मुद्रांकशुल्क अनुदान तात्काळ वितरित करा; सभापती युवराज काकडे यांची जिल्हा परिषदेकडे मागणी.

पुणे; हवेली पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतींना मिळणारे मुद्रांकशुल्क अनुदान अद्याप ग्रामपंचायतींना वर्ग न झाल्यामुळे तालुक्यातील गावपातळीवरील विकासकामे ठप्प आहेत. याबाबत हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी, पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री. भुषण जोशी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

मार्च अखेर जवळ येत असताना निधीअभावी विविध विकासकामे रखडली असून पाणीपुरवठा, रस्ते, लाईट, स्वच्छता, तसेच लहान-मोठ्या पायाभूत सुविधांच्या कामांवर थेट परिणाम होत आहे. गावपातळीवर नियोजित कामांना गती देणे कठीण झाले आहे. याअनुषंगाने हवेलीतील सर्वच ग्रामपंचायतींकडून, मुद्रांकशुल्क अनुदानाबाबत पंचायत समितीकडे वारंवार विचारणा केली जात आहे.

दरम्यान राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ याची मुदत ३१ मार्च २०२६ रोजी संपत आहे. या अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी वेळेत पूर्ण करणे अपेक्षित आहे. परंतू निधीअभावी यातील काही बाबी प्रलंबित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर हवेली पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायतींच्या खात्यावर प्रलंबित मुद्रांकशुल्क अनुदान तात्काळ वर्ग करण्यात यावे, अशी मागणी सभापती काकडे यांनी, जिल्हा परिषदेकडे केली आहे. तसेच याबाबत त्वरित कार्यवाही करण्याची विनंती, मा. उपमुख्यकार्यकारी अधिकारी (पंचायत विभाग) यांच्याकडे करण्यात आली आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930