नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , तालुक्यात एकही दिव्यांग विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये- सभापती युवराज काकडे – जन समाचार लाइव 24

तालुक्यात एकही दिव्यांग विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये- सभापती युवराज काकडे

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

तालुक्यात एकही दिव्यांग विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये- सभापती युवराज काकडे

हवेली तालुक्यात दिव्यांग समावेशित शिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. “शिक्षक हे समाजाचे आधारस्तंभ आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाशाची किरणे पोहोचू शकतात. समावेशित शिक्षणाच्या संकल्पनेतून प्रत्येक दिव्यांग विद्यार्थ्याला सन्मानाने शिक्षणाच्या मूळ प्रवाहात टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे. शासनाच्या विविध सवलती व सुविधांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी केले.

हवेली तालुक्यातील 145 मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी आयोजित समावेशित शिक्षण सक्षमीकरण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपसभापती विद्याताई गायकवाड, गटशिक्षणाधिकारी हेमंतकुमार खाडे, विस्तार अधिकारी निलेश धानापुणे, तज्ञ मार्गदर्शक वैभव पोरे, डॉ. पल्लवी फुलपगार, गायत्री नवले, मोनिषा, प्राचार्य कश्मीरी शाहेदा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपसभापती विद्याताई गायकवाड यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “कोणत्याही दिव्यांग मुलाला शाळेत प्रवेशापासून रोखू नका. प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर लक्ष ठेवणार असल्याचे नमूद करून उलट, त्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या बरोबरीने शिक्षण देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवावा. त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत शिक्षकांनी पालकांसोबत समन्वय ठेवावा.

या कार्यशाळेत दिव्यांगत्वाच्या विविध पैलूंवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. अध्ययन अक्षमता (Learning Disability) या विषयावर वृद्धी एज्युकेशन फाउंडेशनच्या मोनिशा, डॉ. पल्लवी फुलपगार आणि गायत्री नवले यांनी विद्यार्थ्यांची ओळख व त्यांच्या अध्यापन पद्धती यावर मार्गदर्शन केले. समावेशित शिक्षण महत्व या विषयावर वैभव पोरे यांनी, विशेष शिक्षक नवनाथ दर्शिले यांनी प्रशस्त अँप विषयी मार्गदर्शन केले.

21 दिव्यांग प्रवर्ग ओळख या विषयावर विशेष शिक्षिका सुवर्णा पुंडे यांनी कायद्यानुसार असलेल्या 21 प्रवर्गांची सविस्तर माहिती दिली. तसेच आनंददायी शिक्षण व सवलती या विषयावर विशेष शिक्षक श्री. संतोष देशमुख यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गटशिक्षणाधिकारी हेमंतकुमार खाडे यांनी स्पष्ट केले की, तालुक्यातील सर्व शिक्षक एकजुटीने गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विशेष शिक्षकांच्या मदतीने ही गुणवत्ता अधिक उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष शिक्षक संतोष देशमुख यांनी केले, तर उपस्थितांचे आभार विस्तार अधिकारी निलेश धानापुणे यांनी मानले. सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विशेष शिक्षक सुवर्णा पुंडे, गोपाळ शिवशरण, बबीता चव्हाण, ज्योती वाल्हेकर, साहीर सय्यद, संतोष देशमुख, बाळू चव्हाण, दिशा शेवाळे आणि सुनीता गिरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031