नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणी काळभोर पोलिसांची गांजा विक्रेत्यांवर मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी हद्दपार – जन समाचार लाइव 24

लोणी काळभोर पोलिसांची गांजा विक्रेत्यांवर मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी हद्दपार

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणी काळभोर पोलिसांची गांजा विक्रेत्यांवर मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी हद्दपार
लोणी काळभोर (पुणे शहर), दि. १८ फेब्रुवारी २०२६:
झिरो ड्रग्स, गांजा अमलीपदार्थ मुक्त पुणे शहर विशेष मोहिमेअंतर्गत लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गांजा विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. एका घरातून वारंवार गांजा विक्री करणाऱ्या दोन जणांना दोन वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस आयुक्त अमितेश कुमार सो यांच्या आदेशानुसार अमलीपदार्थ विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कठोर व परिणामकारक कारवाई सुरू आहे. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील आरोपी आकाश संतोष भाले (वय २१ वर्षे, रा. गारुडीवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) व महिला आरोपी मंगल संतोष भाले (वय ४० वर्षे) हे त्यांच्या राहत्या घरातून सातत्याने गांजा विक्री करत असल्याचे आढळून आले.
सदर आरोपींविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांनी आपला गुन्हेगारी स्वभाव कायम ठेवत सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणारे कृत्य सुरूच ठेवले होते. त्यांच्या या कृत्यांमुळे परिसरातील सामान्य नागरिक व महाविद्यालयीन विद्यार्थी व्यसनाधीन होत असून सामाजिक वातावरण बिघडत असल्याचे निदर्शनास आले.
यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी आरोपींविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून पोलीस उपायुक्त, परि. ६, पुणे शहर यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार पोलीस उपायुक्तांनी दोन्ही आरोपींना दोन वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपार करण्याचे आदेश जारी केले आहेत.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे)स्मिता पाटील, पोलीस हवालदार सुनील नागलोत, प्रशांत नरसळे, दीपक सोनवणे व महिला पोलीस अंमलदार योगिता भोसुरे आदींनी केली.
पुणे शहरात अमलीपदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध पुढील काळातही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930