नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , श्रीक्षेत्र थेऊर येथे महातारीमाता नवरात्रोत्सवाचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ! – जन समाचार लाइव 24

श्रीक्षेत्र थेऊर येथे महातारीमाता नवरात्रोत्सवाचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ!

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

 

श्रीक्षेत्र थेऊर येथे महातारीमाता नवरात्रोत्सवाचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ!

आमदार राहुल कुल, आमदार ज्ञानेश्वर आबा कटके यांच्यासह राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

थेऊर, प्रतिनिधी |

श्रीक्षेत्र थेऊर येथे महातारीमाता नवरात्रोत्सवाचा शुभारंभ अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी देवीच्या दर्शनासाठी तसेच उत्सवाच्या शुभारंभप्रसंगी राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांसह बहुसंख्येने वारकरी व वैष्णव बांधव उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

या प्रसंगी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष तथा दौंड तालुक्याचे आमदार ॲड. राहुलदादा कुल, शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर आबा कटके, जगद्गुरुकृपांकित ह.भ.प. चेतनानंद महाराज पुणेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा कंद, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाशदादा जगताप, पुणे महानगरपालिका शिक्षण समितीचे उपाध्यक्ष तथा नगरसेवक अतुल तरवडे आणि हवेलीच्या तहसीलदार अर्चना निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच बाजार समितीचे उपसभापती नानासाहेब आबनावे, माजी उपसभापती शशिकांत गायकवाड, रवींद्र कंद, संचालक सुदर्शन चौधरी, यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा रत्नाबाई काळभोर, माजी उपाध्यक्ष किशोर उंद्रे, संचालक दिलीप शिंदे, हेमलता काळभोर, भाजप महिला प्रदेश सचिव पूनम चौधरी, फुरसुंगीचे नगरसेवक चंद्रकांत ढमाळ, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव कांचन, ह.भ.प. विद्याताई महाराज, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार कोळी, केसनंदचे माजी सरपंच मिलिंद हरगुडे आणि वळतीचे सरपंच एल. बी. दादा कुंजीर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नवरात्रोत्सवाच्या शुभारंभामुळे श्रीक्षेत्र थेऊर परिसरात धार्मिक आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले असून, देवीच्या भक्तीने परिसर भक्तिमय झाला आहे. या उत्सवादरम्यान भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहण्याची अपेक्षा आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031