नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , थेऊरमधील प्रस्तावित कचरा प्रकल्पाला विरोध; आमदार माऊली आबा कटके यांची सकारात्मक भूमिका! – जन समाचार लाइव 24

थेऊरमधील प्रस्तावित कचरा प्रकल्पाला विरोध; आमदार माऊली आबा कटके यांची सकारात्मक भूमिका!

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

थेऊरमधील प्रस्तावित कचरा प्रकल्पाला विरोध; आमदार माऊली आबा कटके यांची सकारात्मक भूमिका!

थेऊरगाव कृती समितीच्या वतीने निवेदन सादर; प्रकल्प गावात होऊ नये, अशी ग्रामस्थांची मागणी

थेऊर, प्रतिनिधी |

श्रीक्षेत्र थेऊर येथे प्रस्तावित असलेला घनकचरा प्रक्रिया प्रकल्प गावात होऊ नये, या मागणीसाठी थेऊरगाव कृती समितीच्या वतीने शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार कटके यांनी ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत सकारात्मक भूमिका घेतल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

श्रीक्षेत्र थेऊर हे श्री चिंतामणी गणपती मंदिरामुळे प्रसिद्ध असलेले धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. येथे वर्षभर मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. अशा धार्मिक महत्त्व असलेल्या गावात प्रस्तावित घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येऊ नये, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील पर्यावरण, स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्यावर संभाव्य परिणाम होण्याची भीतीही ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर थेऊरगाव कृती समितीच्या वतीने आमदार माऊली आबा कटके यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. प्रस्तावित प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य समस्या आणि ग्रामस्थांच्या भावना त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.

यावेळी आमदार माऊली आबा कटके यांनी ग्रामस्थांच्या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेत, प्रस्तावित कचरा प्रक्रिया प्रकल्प थेऊर येथे होऊ नये, या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे प्रकल्पाविरोधात आवाज उठवणाऱ्या ग्रामस्थांच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.

ग्रामस्थांच्या भावनांचा आदर राखून सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल आमदार माऊली आबा कटके यांचे थेऊरगाव कृती समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

दरम्यान, श्रीक्षेत्र थेऊरचे धार्मिक महत्त्व आणि ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन संबंधित प्रशासनानेही या प्रकल्पाबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031