उरुळी कांचनच्या शिवराज साने यांना ‘स्वर कला उत्कृष्टता पुरस्कार २०२६’ प्रदान
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
उरुळी कांचनच्या शिवराज साने यांना ‘स्वर कला उत्कृष्टता पुरस्कार २०२६’ प्रदान
उरुळी कांचन (प्रतिनिधी) : कला, सामाजिक बांधिलकी आणि आपल्या कार्यक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत उरुळी कांचन येथील साने संगीत विद्यालय व साने लोककला मंचचे अध्यक्ष शिवराज ज्ञानोबा साने यांना प्रतिष्ठेचा ‘स्वर कला उत्कृष्टता पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.
स्वर कला संघ, गोवा आणि समाज कल्याण संचालनालय, गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. आमदार गोविंद गावडे, आमदार पेमेंद्र शेट तसेच सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रुती पारकर यांच्या हस्ते शिवराज साने यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कला क्षेत्रासोबतच सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवराज साने यांच्या कार्याची दखल घेत त्यांना मिळालेल्या या सन्मानामुळे उरुळी कांचनसह हवेली तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शिवराज साने यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या कार्याचा गौरव हा कला क्षेत्रात कार्यरत असलेल्या नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
या पुरस्कार सोहळ्यास आयोजक डॉ. बाळकृष्ण खरात, फिरोज शेख, मल्टी जुनियर प्रोफेशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे व लंडनचे संस्थापक-व्यवसाय संचालक व करिअर मार्गदर्शक माणदेशी, उपसंपादक राहुल खरात, संदीप रासकर, दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा कानगावचे सरपंच राहुल जी. चाबुकस्वार, रघुनाथराव ढोक, फुले-शाहू-आंबेडकर एज्युकेशन ट्रस्टच्या राखी रासकर, सम्राट बहुतेश देशाच्या जनजागृती सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा रेखा शिवराज साने, कु. पूजा कोटी, सुरेखा यश बेहरा, मिलिंद सरवदे आदी मान्यवर उपस्थित होते.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





