नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , पीएमपीएमएलची आणखी एक पर्यटन बससेवा सुरू; मुळशी धरण, जेटी बोटिंग आणि पळसे धबधब्याची सफर अवघ्या ५०० रुपयांत – जन समाचार लाइव 24

पीएमपीएमएलची आणखी एक पर्यटन बससेवा सुरू; मुळशी धरण, जेटी बोटिंग आणि पळसे धबधब्याची सफर अवघ्या ५०० रुपयांत

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

पीएमपीएमएलची आणखी एक पर्यटन बससेवा सुरू; मुळशी धरण, जेटी बोटिंग आणि पळसे धबधब्याची सफर अवघ्या ५०० रुपयांत

पुणे, दि. ३० जुलै : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) ने पर्यटकांसाठी आणखी एक नवीन पर्यटन बससेवा सुरू केली असून, पर्यटन बससेवा क्र. ९अ दि. २९ जुलै पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. पावसाळी पर्यटनाला मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन ही सेवा सुरू करण्यात आली असून, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. महेश आव्हाड यांच्या निर्देशानुसार या नव्या मार्गाची सुरुवात करण्यात आली आहे.

पीएमपीएमएलच्या पर्यटन बससेवेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या नव्या मार्गासह महामंडळाच्या एकूण १३ पर्यटन बससेवा कार्यरत आहेत. पावसाळ्यात धरणे, धबधबे आणि निसर्गरम्य परिसर अनुभवता यावा, या उद्देशाने पर्यटन बससेवा क्र. ९अ सुरू करण्यात आली आहे.

या बसचा मार्ग पुणे स्टेशन – स्वारगेट – डेक्कन जिमखाना – मुळशी – शिवालय मंदिर – जेटी बोटिंग – टाटा मुळशी धरण – पळसे धबधबा – डेक्कन जिमखाना – स्वारगेट – पुणे स्टेशन असा राहणार आहे. या प्रवासादरम्यान पर्यटकांना मुळशी परिसरातील निसर्गसौंदर्य, धरणाचा नजारा, जेटी बोटिंगचा अनुभव तसेच पळसे धबधब्याचा आनंद घेता येणार आहे.

या पर्यटन बससेवेचे तिकीटदर केवळ ५०० रुपये ठेवण्यात आले असून, त्यामध्ये संपूर्ण पर्यटन सफरीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे कमी खर्चात कुटुंबासह किंवा मित्रमंडळीसोबत एकदिवसीय सहलीचा आनंद घेण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.

पर्यटन बससेवेचे बुकिंग डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक, निगडी आणि मनपा भवन येथील पास केंद्रांवर करता येणार आहे.

पीएमपीएमएलने नागरिकांना या किफायतशीर पर्यटन बससेवेचा लाभ घेऊन पावसाळ्यातील निसर्गरम्य स्थळांचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930