नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , लोणी काळभोर पोलिसांकडून एंजल हायस्कूलमध्ये अंमलीपदार्थविरोधी, सायबर व महिला सुरक्षा जनजागृती कार्यशाळा – जन समाचार लाइव 24

लोणी काळभोर पोलिसांकडून एंजल हायस्कूलमध्ये अंमलीपदार्थविरोधी, सायबर व महिला सुरक्षा जनजागृती कार्यशाळा

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

लोणी काळभोर पोलिसांकडून एंजल हायस्कूलमध्ये अंमलीपदार्थविरोधी, सायबर व महिला सुरक्षा जनजागृती कार्यशाळा

पुणे, दि. २२ जुलै : लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या वतीने एंजल हायस्कूल, छत्रपती संभाजी नगर, कदम वस्ती (ता. हवेली) येथे इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अंमलीपदार्थविरोधी जनजागृती, सायबर सुरक्षा आणि महिला सुरक्षा या विषयांवर विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

आज सकाळी ११.३० ते दुपारी १.०० या वेळेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक मेहेर तसेच महिला पोलीस अंमलदार थोरात आणि शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती दिली.

कार्यशाळेत बाल लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण (POCSO) अधिनियम, २०१२, गुड टच – बॅड टच, सेफ आणि अनसेफ टच, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, NDPS कायदा, वाढती बालगुन्हेगारी, वाहतूक नियम, मोबाईलचा सुरक्षित वापर, सायबर फसवणूक टाळण्याचे उपाय तसेच महिला सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यार्थ्यांना Facebook, WhatsApp, Instagram, X (Twitter), Telegram, YouTube, Snapchat आणि LinkedIn यांसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा सुरक्षित व जबाबदारीने वापर कसा करावा याबाबतही माहिती देण्यात आली.

शाळेत येताना-जाता किंवा परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती अथवा घटना आढळल्यास तात्काळ १०९०, १०९१, ११२ आणि १९३० या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच दामिनी मार्शल सेवेची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.

यावेळी शाळेतील शिक्षक, कर्मचारी, सफाई कर्मचारी व हेल्पर यांच्या चारित्र्य पडताळणीची खात्री करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. शाळेतील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असल्याची पाहणी करण्यात आली. तक्रारपेटीची तपासणी केली असता कोणतीही तक्रार आढळून आली नाही.

शाळा सुटल्यानंतर गेटबाहेर किंवा परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही विद्यार्थ्यांना करण्यात आले.

या जनजागृती कार्यशाळेस सुमारे २०० ते २५० विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930