नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , कोलवडीतील नैसर्गिक ओढ्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या आदेशाला केराची टोपली? गट क्रमांक ७३२ मधील अडथळा अद्याप कायम; तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी कधी? – जन समाचार लाइव 24

कोलवडीतील नैसर्गिक ओढ्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या आदेशाला केराची टोपली? गट क्रमांक ७३२ मधील अडथळा अद्याप कायम; तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी कधी?

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

कोलवडीतील नैसर्गिक ओढ्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या आदेशाला केराची टोपली?

गट क्रमांक ७३२ मधील अडथळा अद्याप कायम; तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी कधी?

 प्रतिनिधी

हवेली तालुक्यातील मौजे कोलवडी येथील गट क्रमांक ७३२ मधील नैसर्गिक ओढ्यावर करण्यात आलेले अतिक्रमण हटवून ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करण्याचे अपर तहसीलदार, लोणी काळभोर यांनी स्पष्ट आदेश दिले असतानाही संबंधित ठिकाणी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशालाच केराची टोपली दाखविण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

मामलेदार कोर्ट अॅक्ट, १९०६ च्या कलम ५ अंतर्गत झालेल्या सुनावणीनंतर पाच संबंधितांना नैसर्गिक ओढ्यावर टाकलेले सिमेंटचे पाईप व अडथळा हटविण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करण्याचेही निर्देश देण्यात आले होते.

मात्र आदेशानंतरही संबंधित ठिकाणी अतिक्रमण कायम असल्याने स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळ्यात ओढ्याचा प्रवाह अडल्याने परिसरात पाणी साचणे, शेतीचे नुकसान होणे आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा धोका कायम असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला प्रश्न उपस्थित केला आहे की, तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी नेमकी कधी होणार? आदेश असूनही अतिक्रमण हटविले जात नसेल, तर अशा आदेशांचा उपयोग काय, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, कोलवडीसह परिसरातील अनेक ठिकाणी गुंठेवारी प्लॉटिंगसाठी नैसर्गिक ओढे-नाले बुजविण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे केवळ गट क्रमांक ७३२ पुरतेच नव्हे, तर अशा सर्व अतिक्रमणांवर महसूल विभागाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

“प्रशासनाने दिलेल्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करून नैसर्गिक जलप्रवाह मोकळा करावा, अन्यथा पावसाळ्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही,” अशी प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930