नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , थेऊर ग्रामपंचायत फेर आरक्षणावरून प्रश्नचिन्ह; ग्रामस्थांसमोर आरक्षण न काढता, तयार करून आणलेल्या आरक्षणाचे केवळ सभागृहात वाचन ! – जन समाचार लाइव 24

थेऊर ग्रामपंचायत फेर आरक्षणावरून प्रश्नचिन्ह; ग्रामस्थांसमोर आरक्षण न काढता, तयार करून आणलेल्या आरक्षणाचे केवळ सभागृहात वाचन !

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

थेऊर ग्रामपंचायत फेर आरक्षणावरून प्रश्नचिन्ह; ग्रामस्थांसमोर आरक्षण न काढता, तयार करून आणलेल्या आरक्षणाचे केवळ सभागृहात वाचन !

थेऊर, प्रतिनिधी : थेऊर ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी वार्डनिहाय फेर आरक्षण प्रक्रियेला पुन्हा एकदा वादाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. स्थानिक नागरिकांनी केलेल्या आरोपानुसार, वार्डनिहाय फेर आरक्षणाची संपूर्ण स्क्रिप्ट आधीच तयार करून आणण्यात आली होती आणि सभागृहात प्रत्यक्ष चर्चा न करता केवळ त्या स्क्रिप्टचे वाचन करण्यात आले.

यामुळे फेर आरक्षण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडली का, याबाबत ग्रामस्थांमध्ये गंभीर शंका व्यक्त केली जात आहे. उपस्थित नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सभागृहात कोणतीही सविस्तर चर्चा, हरकतींचा विचार किंवा प्रक्रियेतील आवश्यक टप्प्यांचे पालन झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे ही प्रक्रिया केवळ औपचारिकता ठरल्याचा आरोप करण्यात येत आहे.

ग्रामस्थांनी या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करून फेर आरक्षण नियमांनुसार व पारदर्शक पद्धतीने झाले का, याची पडताळणी करण्याची मागणी संबंधित प्रशासनाकडे केली आहे. तसेच, आवश्यक असल्यास संपूर्ण प्रक्रियेचा अधिकृत अहवाल व सभेचे इतिवृत्त सार्वजनिक करण्याची मागणीही पुढे येत आहे. यावेळी सभागृहात मोठ्याप्रमाणात नागरिकांनी उभे राहून या प्रक्रियेला विरोध करून निषेध नोंदवीला.

दरम्यान, या आरोपांबाबत हवेली तहसीलदार कार्यालयाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाकडून यासंदर्भात स्पष्टीकरण आल्यानंतर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930