नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी अवघ्या ६ तासांत जेरबंद; वाघोली पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी – जन समाचार लाइव 24

मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी अवघ्या ६ तासांत जेरबंद; वाघोली पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी अवघ्या ६ तासांत जेरबंद; वाघोली पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

पुणे, दि. ४ जुलै : पुणे शहरातील वाघोली पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने मित्राचा निर्घृण खून करून पसार झालेल्या आरोपीला अवघ्या सहा तासांत अटक करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४४२/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मयत आणि आरोपी हे दोघेही सेंट्रिंग मिस्त्री म्हणून एकाच बांधकाम साईटवर काम करत होते. मांजरी खुर्द येथील सिन्ना अंकल यांच्या फार्महाऊसमधील राहत्या खोलीत झालेल्या वादातून आरोपीने रागाच्या भरात मित्रावर लोखंडी हातोडा आणि लोखंडी पाइपने डोक्यावर, चेहऱ्यावर व कपाळावर वार करून त्याचा खून केला.

या घटनेत शिवशंकर मोहनमाड सिंह (वय ४७) यांचा मृत्यू झाला असून, सुरज अमृत साव (वय ३५, मूळ रा. भालुका, जिल्हा नाडिया, पश्चिम बंगाल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेनंतर आरोपी पश्चिम बंगालचा रहिवासी असल्याने त्याचा माग काढणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई विशाल गायकवाड यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास पथकाने सातारा जिल्ह्यातील आदर्शदीप नगर येथील एका बांधकाम साईटवर सापळा रचला.

पोलीस हवालदार प्रदीप मोटे, पोलीस शिपाई सुनील कुसाळकर आणि दीपक कोकरे यांनी आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी अवघ्या सहा तासांत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शहदेव हवाले करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड तसेच वाघोली पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031