नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , आषाढी वारीसाठी PMPML ची विशेष तयारी; १७९ नियमित व ३२ अतिरिक्त बस, गरजेनुसार आणखी ६० बस सज्ज – जन समाचार लाइव 24

आषाढी वारीसाठी PMPML ची विशेष तयारी; १७९ नियमित व ३२ अतिरिक्त बस, गरजेनुसार आणखी ६० बस सज्ज

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

आषाढी वारीसाठी PMPML ची विशेष तयारी; १७९ नियमित व ३२ अतिरिक्त बस, गरजेनुसार आणखी ६० बस सज्ज

पुणे, दि. ३ जुलै :
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त भाविकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) ने विशेष बससेवेचे नियोजन केले आहे. ५ जुलै ते ९ जुलै २०२६ या कालावधीत आळंदी, देहू आणि पुणे परिसरात नियमित बससेवेसोबत अतिरिक्त बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

आळंदीसाठी स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, मनपा, निगडी, भोसरी, हिंजवडी आणि चिंचवड येथून एकूण १७९ बस चालविण्यात येणार आहेत. याशिवाय ८ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत विशेष बससेवा उपलब्ध राहणार आहे.

देहूसाठी पुणे स्टेशन, मनपा आणि निगडी येथून ३२ अतिरिक्त बस सोडण्यात येणार असून, गरजेनुसार आणखी १५ बस उपलब्ध करून देण्यात येतील.

६ जुलै रोजी आळंदीहून पालखी प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर पहाटे ५.३० वाजल्यापासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर आणि मनपा येथून १८ अतिरिक्त बस चालविण्यात येणार आहेत.

याशिवाय पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील नियमित मार्गांवर सुमारे १५० बस प्रवाशांच्या सेवेत राहणार असून, प्रवासीसंख्येनुसार गरज भासल्यास ६० अतिरिक्त बस सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

पालखी सोहळ्यादरम्यान काही मार्गांवर वाहतुकीत बदल होणार असल्याने प्रवाशांनी PMPML च्या पर्यायी बससेवेचा लाभ घ्यावा, तसेच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन महामंडळाने केले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031