नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , पीएमपीएमएलची ‘सवलतीचे बस पास सुविधा आपल्या दारी’ मोहीम; शाळा-महाविद्यालयांमध्येच बस पास उपलब्ध – जन समाचार लाइव 24

पीएमपीएमएलची ‘सवलतीचे बस पास सुविधा आपल्या दारी’ मोहीम; शाळा-महाविद्यालयांमध्येच बस पास उपलब्ध

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

पीएमपीएमएलची ‘सवलतीचे बस पास सुविधा आपल्या दारी’ मोहीम; शाळा-महाविद्यालयांमध्येच बस पास उपलब्ध

पुणे | प्रतिनिधी

पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) ने विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय टाळण्यासाठी “सवलतीचे बस पास सुविधा आपल्या दारी” हा विशेष उपक्रम सुरू केला आहे. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आहेर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून, विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक संस्थेतच बस पास मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

या उपक्रमांतर्गत पीएमपीएमएलचे पथक शाळा, महाविद्यालये, इन्स्टिट्यूट, अकॅडमी तसेच विविध शैक्षणिक संस्थांना प्रत्यक्ष भेट देत आहे. यावेळी विद्यार्थ्यांना सवलतीच्या बस पासची माहिती देण्यात येत असून, ऑन-द-स्पॉट अर्ज स्वीकारून तत्काळ बस पास वितरणाची सुविधाही उपलब्ध करून दिली जात आहे.

या उपक्रमाला विविध शैक्षणिक संस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य आणि संस्थाचालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

यापूर्वी विद्यार्थी आणि पालकांना बस पास मिळविण्यासाठी पीएमपीएमएलच्या पास विभागात जावे लागत होते. मात्र, आता ही सेवा थेट शैक्षणिक संस्थांमध्ये उपलब्ध होत असल्याने वेळ, प्रवासाचा खर्च आणि गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

ज्या शाळा, महाविद्यालये किंवा इतर शैक्षणिक संस्थांना हा उपक्रम आपल्या परिसरात आयोजित करावयाचा असेल त्यांनी पीएमपीएमएलच्या पास विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930