नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , पुण्यात ३.६५ लाखांचा गुटखा-पान मसाला साठा जप्त; दोघांवर गुन्हा दाखल – जन समाचार लाइव 24

पुण्यात ३.६५ लाखांचा गुटखा-पान मसाला साठा जप्त; दोघांवर गुन्हा दाखल

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

पुण्यात ३.६५ लाखांचा गुटखा-पान मसाला साठा जप्त; दोघांवर गुन्हा दाखल

पुणे, दि. २७ : पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-२ ने वडगाव शेरी परिसरात कारवाई करत ३ लाख ६५ हजार ३३९ रुपयांचा प्रतिबंधित पान मसाला, गुटखा व तंबाखुजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त शहरात सुरू असलेल्या विशेष गस्ती दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण व त्यांच्या पथकाला धन्वंतरी कॉलनी, मुन्नुरवार सोसायटी, गायत्री सदन सोसायटीमागील एका गोदामात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार छापा टाकण्यात आला.

या कारवाईत रामलाल उर्फ रमेश गायडराम देवासी (रा. वडगाव शेरी) आणि गणेश चंद्रकांत पटवा (रा. वाघोली) यांच्याकडून १,१५,११६ रुपयांचा गुटखा-पान मसाला, ३०,२२३ रुपयांचा तंबाखुजन्य पदार्थ, २० हजार रुपयांचे दोन मोबाईल फोन आणि २ लाख रुपयांची मारुती सुझुकी ओमनी कार असा एकूण ३,६५,३३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता तसेच सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जीवन माने, सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण व अंमली पदार्थ विरोधी पथक-२ च्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930