नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , शासनबंदी असलेला विमल पान मसाला जप्त; आरोपी जेरबंद – जन समाचार लाइव 24

शासनबंदी असलेला विमल पान मसाला जप्त; आरोपी जेरबंद

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

शासनबंदी असलेला विमल पान मसाला जप्त; आरोपी जेरबंद

पुणे, प्रतिनिधी : कोंढवा बुगा-येवलेवाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पान मसाला विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून पान मसाला, तंबाखू आणि वाहनासह एकूण ६ लाख ४५ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कोंढवा बुगा-येवलेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील व पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिपक कारंडे यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करून गस्त वाढविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे यांच्या पथकाने माहितीच्या आधारे सापळा रचला.

तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश चिंचकरविजय खेंगरे यांना १७ जून २०२६ रोजी माहिती मिळाली की, टिळेकरनगर येथील जगताप गोठ्याजवळ एमएच-१२ आरएफ-६२३४ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी उभी असून त्यामध्ये शासनबंदी असलेला गुटखा व पान मसाला साठवून ठेवण्यात आला आहे.

माहितीची खातरजमा करून पोलीस निरीक्षक भगवान गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला. यावेळी रमेश हिरालाल प्रजापती (वय ३५, रा. कमल व्हिला सोसायटी, गोकुळनगर, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या बोलेरो वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये विक्रीसाठी ठेवलेला विमल पान मसाला व त्यात मिसळण्यासाठीची तंबाखू आढळून आली.

पोलिसांनी प्रतिबंधित पदार्थांसह वाहन असा एकूण ६,४५,२३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीविरुद्ध कोंढवा बुगा-येवलेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलीस आयुक्त नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील आणि पोलीस निरीक्षक दिपक कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे यांच्यासह अभिजीत जाधव, अभिजीत रत्नपारखी, गणेश चिंचकर, विजय खेंगरे, अनिल बनकर, किशोर पवार, रुपेश पाटील, लक्ष्मण होळकर, मयूर मोरे आणि सुजित मदन यांनी सहभाग घेतला.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930