पुणे मनपा हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी पीएमपीएमएलचे अनुदानित बस पास वितरण सुरू
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
पुणे मनपा हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी पीएमपीएमएलचे अनुदानित बस पास वितरण सुरू
पुणे, प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या प्रवासाला आर्थिक दिलासा देण्यासाठी (पीएमपीएमएल) कडून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अनुदानित बस प्रवास पास वितरणास सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पुणे मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना १०० टक्के मोफत बस प्रवासाची सुविधा देण्यात येणार असून, खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांना ७५ टक्के अनुदानित पास उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
या योजनेनुसार पुणे मनपा शाळांमधील इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना १०० टक्के अनुदानित मोफत बस प्रवास पास देण्यात येणार आहेत. तसेच पुणे मनपा हद्दीतील खाजगी शाळांमधील इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांना ७५ टक्के सवलतीचे बस पास दिले जाणार आहेत.
या पासेससाठी अर्जांचे वितरण १५ जून २०२६ पासून सुरू झाले असून, खालील आगारांमधून तसेच सर्व पास केंद्रांवर अर्ज उपलब्ध आहेत :
- स्वारगेट
- न. ता. वाडी
- कोथरूड
- कात्रज
- हडपसर
- लो. आण्णाभाऊ साठे
- पुणे स्टेशन
- बालेवाडी
- भेकराईनगर
- शेवाळेवाडी
- बाणेर
- वाघोली
भरून दिलेले अर्ज संबंधित आगारांमध्ये स्वीकारले जाणार आहेत. शाळा किंवा त्यांच्या प्रतिनिधींना विद्यार्थ्यांचे अर्ज एकत्रित स्वरूपात घेऊन जाण्याची व जमा करण्याची सुविधा देण्यात आली आहे. अशा प्रकारे एकत्रित अर्ज जमा केल्यास संबंधित शैक्षणिक संस्थेला एकत्रित पास उपलब्ध करून दिले जातील आणि शाळा प्रमुखांमार्फत विद्यार्थ्यांना त्यांचे वितरण करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना आगारात येण्याची आवश्यकता भासणार नाही.
खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी अर्ज व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर प्रवासाच्या अंतरानुसार पासच्या एकूण रकमेपैकी २५ टक्के रकमेचे चलन देण्यात येईल. ही रक्कम पुणे मनपा हद्दीतील च्या कोणत्याही शाखेत भरल्यानंतर अर्ज, चलन व आवश्यक कागदपत्रे संबंधित आगारात जमा केल्यास पास मिळू शकणार आहे.
या योजनेची सविस्तर माहिती महामंडळाच्या सर्व आगारांमध्ये उपलब्ध असून, पुणे मनपा शाळांतील तसेच खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांनी या सवलतीच्या पास योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएलकडून करण्यात आले आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





