नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , भारत उत्सव राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत द टायग्रिष स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश – जन समाचार लाइव 24

भारत उत्सव राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत द टायग्रिष स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

भारत उत्सव राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत द टायग्रिष स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

लोणी काळभोर, प्रतिनिधी :
अखिल लोककला कल्चरल ऑर्गनायझेशन आयोजित भारत उत्सव राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत लोणी काळभोर येथील द टायग्रिष स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

या स्पर्धेत शाळेच्या भरतनाट्यम ग्रुप डान्सने संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच वेस्टर्न ग्रुप डान्स आणि तबला वादन ग्रुप यांनी द्वितीय क्रमांक, तर फोक डान्स ग्रुपने तृतीय क्रमांक मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली.

नृत्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल शाळेचे नृत्य प्रशिक्षक सुयश सुरवसे यांना प्रतिष्ठेचा राष्ट्रीय कलाक्षेत्रम पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर आपली कला सादर करत यश संपादन केले.

सोलो डान्स स्पर्धेत श्रेयश्री राऊत हिने द्वितीय क्रमांक मिळविला. तर अजय वाघमारे, शरण्या लोंढे, समृद्धी लोंढे, प्रिन्सिका लोणकर आणि अद्विका फुलमंते यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. याशिवाय एकपात्री अभिनय स्पर्धेत अजय वाघमारे याने द्वितीय क्रमांक मिळवून आणखी एक मानाचा बहुमान शाळेला मिळवून दिला.

विशेष म्हणजे, नोव्हेंबर महिन्यात व्हिएतनाम येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी द टायग्रिष स्कूलच्या विद्यार्थ्यांची निवड झाली असून, ही शाळा आणि परिसरासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील सुमारे ३,५०० कलाकारांनी सहभाग घेतला होता. अशा स्पर्धेत द टायग्रिष स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली आहे. गेल्या तीन वर्षांपासून शाळा विविध नृत्य स्पर्धांमध्ये सातत्याने यश संपादन करत आहे.

शाळेचे सीईओ चंद्रशेखर वाघ यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य दिशा मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल वाघ सरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पालकांनीही विद्यार्थ्यांच्या या यशाचे कौतुक करून आनंद व्यक्त केला.

राष्ट्रीय स्तरावरील या उल्लेखनीय यशामुळे लोणी काळभोर परिसरात द टायग्रिष स्कूलच्या विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930