नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , पुण्यातील घरफोडी प्रकरण उघड; अट्टल चोरट्यांना बेड्या, १८.४९ लाखांचा मुद्देमाल जप्त – जन समाचार लाइव 24

पुण्यातील घरफोडी प्रकरण उघड; अट्टल चोरट्यांना बेड्या, १८.४९ लाखांचा मुद्देमाल जप्त

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

पुण्यातील घरफोडी प्रकरण उघड; अट्टल चोरट्यांना बेड्या, १८.४९ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : कसबा पेठ परिसरातील घरफोडी प्रकरणाचा छडा लावत फरासखाना पोलिसांनी दोन अट्टल आरोपींना अटक करत तब्बल १८ लाख ४९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींकडून चोरीतील सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल तसेच दरवाजा तोडण्यासाठी वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले आहे.

दि. ६ मार्च २०२६ रोजी रात्री ८.३० ते १० वाजण्याच्या दरम्यान बंटी कॉर्नर बिल्डिंग, दुसरा मजला, फ्लॅट क्रमांक ३, पवळे चौक, कसबा पेठ येथे अज्ञात चोरट्यांनी सेफ्टी दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला होता. आरोपींनी बेडरूममधील १३०.३०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ५० हजार रुपयांची रोकड असा एकूण ११ लाख ७ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करताना पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे व तपास पथकाने परिसरातील खासगी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यावेळी पोलीस हवालदार गजानन सोनुने यांनी आरोपींची ओळख पटवली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी वारंवार ठिकाणे बदलत दिल्ली, अयोध्या, आग्रा, झाशी, लातूर, बार्शी आणि छत्रपती संभाजीनगर येथे आश्रय घेतला होता.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर फरासखाना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे चंद्रकांत उर्फ चंद्या अनंत माने (वय ३३, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवडगाव, पुणे) आणि रामा उर्फ रामजाने लक्ष्मण क्षिरसागर (वय ३३, रा. गौर वाघोली, ता. कळंब, जि. धाराशिव) अशी आहेत.

पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी चोरीतील १३०.३०० ग्रॅम सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि अॅडजस्टेबल पाना असा एकूण १८ लाख ४९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त श्री. मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिवप्रकाश मुळे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे, पोलीस हवालदार गजानन सोनुने यांच्यासह नितीन तेलंगे, महेश राठोड, प्रविण पासलकर, विशाल शिंदे, नितीन जाधव, महेश पवार, चेतन होळकर, सुमित खुट्टे, शशीकांत ननावरे, प्रशांत पालांडे व लोंढे यांनी सहभाग घेतला.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930