नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , कोलवडी गावातील वीज समस्यांबाबत मनसेचे महावितरणला निवेदन – जन समाचार लाइव 24

कोलवडी गावातील वीज समस्यांबाबत मनसेचे महावितरणला निवेदन

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

कोलवडी गावातील वीज समस्यांबाबत मनसेचे महावितरणला निवेदन

हवेली तालुक्यातील कोलवडी गावातील विविध वीज समस्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ऊरळी कांचन विभागाचे सहायक अभियंता धाडवे साहेब यांना निवेदन देण्यात आले.

शेतकऱ्यांना शेती पंपासाठी रात्रीच्या वेळेस वीजपुरवठा केला जात असल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी परिसरात बिबट्या व सापांचा धोका वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेती पंपासाठी दिवसा किंवा सकाळच्या वेळेत वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

तसेच गावातील जळालेले रोहित्र त्वरित बदलून देण्यात यावेत व त्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये, अशीही मागणी करण्यात आली. अनेकदा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत होण्यासाठी उशीर होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. त्यामुळे वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्यात यावा, अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

यावेळी मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष काका गायकवाड, तालुका उपाध्यक्ष धर्मेंद्र गावडे, गंगाराम तांबे, विशाल शेळके आदी उपस्थित होते.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930