नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9999999999 , +91 99999999999 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें , कारच्या काचा फोडून चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद; १२.१८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत – जन समाचार लाइव 24

कारच्या काचा फोडून चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद; १२.१८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊

कारच्या काचा फोडून चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद; १२.१८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पुणे : रोडच्या कडेला तसेच निर्जन ठिकाणी पार्क केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस अलंकार पोलीसांनी अटक केली असून त्याच्याकडून सोन्याचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल आणि दुचाकीसह एकूण १२ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अलंकार पोलीस स्टेशन हद्दीत मागील काही दिवसांत कारच्या काचा फोडून चोरीचे सहा गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त श्री. संभाजी कदम यांनी दिले होते. त्यानुसार तपास पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी राजू बाबराव जावळकर (वय ५७, रा. डोणजे फाटा, ता. हवेली, जि. पुणे) यास ताब्यात घेतले.
सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे देत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने अलंकार पोलीस स्टेशन हद्दीत कारच्या काचा फोडून चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सहा गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
उघडकीस आलेले गुन्हे
गु.र.नं. ७३/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०३(२), ३२४(४)
गु.र.नं. ७७/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०५(अ), ३२४(४)
गु.र.नं. ६०/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०३(२), ३२४(४)
गु.र.नं. ७२/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०५(अ), ३२४(४)
गु.र.नं. ७६/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०५(अ), ३२४(४)
गु.र.नं. ३१/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०५(अ), ३२४(४)
पोलिसांनी आरोपीकडून ९७.२०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अॅपल कंपनीचा लॅपटॉप, दोन मोबाईल, ३ हजार रुपये रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली ज्युपिटर मोपेड असा एकूण १२ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दरम्यान, आरोपी राजू जावळकर याच्यावर पुणे शहर, पुणे ग्रामीण, कोल्हापूर, सातारा, संभाजीनगर, अहिल्यानगर आणि पिंपरी-चिंचवड येथील विविध पोलीस ठाण्यांमध्ये १०० हून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त श्री. मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अलंकार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उल्हारा कदम, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती रिमता पाटील यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित, महेश निंबाळकर तसेच पोलीस अंमलदार धीरज पवार, सोमेश्वर यादव, माधुरी कुंभार, राकेश क्षिरसागर, शिवाजी शिंदे, आशिष राठोड आणि विशाल मोरे यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.

Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें 

Advertising Space


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930